"ह्युगो चावेझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या चावेझ यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात लष्करी अधिकारी म्हणून केली. वेनेझुएलामधील राजकिय अनास्थेला कंटाळून त्यांनी गुप्तपणे 'क्रांतिकारी बोलिवरियन चळवळ- २००' ची सुरूवात केली. ८० च्या दशकाच्या अखेरीस त्यांनी सरकार उलथवून लावण्याच्या प्रयत्नांना वेग दिला. १९९२ मध्ये [[कारलोस आन्द्रेस पेरेझ]] यांच्या नेतृत्वाखाली असलेले 'लोकशाही चळवळ' सरकार उलथवून लावण्याचा लष्करी कट त्यांनी आखला. पण हा कट अपयशी ठरला आणि त्यांची दोन वर्षांसाठी रवानगी तुरुंगात झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी समाजवादी विचारसरणीच्या 'पाचवी लोकशाही चळवळ' या राजकिय पक्षाची स्थापना केली आणि पुढे १९९८ मध्ये चावेझ वेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
 
राष्ट्रपती पदावर निवडून गेल्यावर त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना अधिक अधिकार मिळवून दिले. देशाच्या सरकारी संरचनेत अनेक महत्वाचे बदल घडवून आणले. २००० मध्ये पुन्हा राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या चावेझ यांनी सहकार चळवळीचा देशात पाया घातला. भूसंपादन आणि जमिनींच्या पुनर्जिवीकरणांची सुरुवात केली. अनेक महत्वाच्या उद्योगधंद्यांचे त्यांनी राष्ट्रियीकरण केले.२००६ मध्ये ६०% हून अधिक मताधिक्याने त्यांनी आपला विजय नोंदवला. ७ ऑक्टोबर २०१२ रोजी [[हेनरिक कॅप्रिलेस]] यांचा पराभव करून चावेझ चौथ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
 
{{विस्तार}}