"तेलुगू भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४८:
८. यर्राप्रगड (इसवी सनाचे १४वे शतक)

९. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक)

१०. '''श्रीनाथ''' (इ.स. १३८० ते १४६०)

काव्यप्रबंध काळाचा मुकुटमणी. लहानपणीच श्रीनाथाने तेलुगू व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि तो थोडीफार कविताही करू लागला होता. तरुणपणी याने श्रीहर्ष कवीच्या [[नैषधीय]] या संस्कृत महाकाव्याचा तेलुगू अनुवाद केला. त्या अनुवादित ग्रंथाला ’शृंगार नैषध’ असे म्हणतात. तेलुगूतल्या पाच महाकाव्यातले हे एक आहे. या काव्याने श्रीनाथ कवीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि कोंडविच्डूया या राजाकडे आश्रयही. राजाने त्याची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली.

इ.स. १४२५च्या सुमारास श्रीनाथने राजाश्रय सोडला आणि तो देशाटनाला निघाला. प्रवासातच त्याने ’हरविलाससमु’ नावाचे काव्य रचले. त्या काव्यात शिवलीलांचे मनोहर वर्णन केले आहे. पुढे श्रीनाथ विजयनगरला गेला. त्यावेळी तेथे कृष्णदेवराय गादीवर होता. त्याच्या दरबारात असताना श्रीनाथने, गौड डिंडिमभट्ट नावाच्या कवीला शास्त्रार्थात हरविले. या विजयामुळे श्रीनाथला कविसार्वभौम ही पदवी मिळाली. राजाने त्याचा सुवर्णाभिषेकही केला.

त्यानंतर श्रीनाथ तेलंगणातील राचकोंडाचा राजा सर्वज्ञसिंगम याच्या दरबारी आणि नंतर राजमहेंद्रवरम्‌‍च्या वीरभद्र रेड्डी या राजाच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने ’भीमखंड’,’काशीखंड’ आणि ’पल्नाडि वीरचरित्रमु’ ही काव्ये रचली. या शेवटच्या काव्यात श्रीनाथची प्रतिभा सर्वोच्चबिंदूला पोचली होती. या कवीचे बहुतेक आयुष्य मानमरातबात आणि वैभवविलासात गेले.

११. '''क्षेत्रय्या''' (इसवी सनावे १७वे शतक)

हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले.

पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात.

आजही आंध्र प्रदेशात आणि तमिळनाडूत क्षेत्रय्याचे काव्य लोकप्रिय आहे. त्याने हजारो पदे रचली असली तरी त्याला शिष्यपरंपरा न लाभल्याने त्याची बरीचशी काव्यरचना काळाच्या ओघात लुप्त झाली.