"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५२:
=== आधुनिक संकल्पना ===
==== न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम ====
[[चित्र:NewtonsLawOfUniversalGravitation.svg|इवलेसे|न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे चित्रीकरण. m<sub>1</sub> हा वस्तुमान m<sub>2</sub> ह्या वस्तुमानाला F<sub>2</sub> बलाने व m<sub>2</sub> हा m<sub>1</sub>ला F<sub>1</sub> बलाने आकर्षितो. न्यूटनच्या [[न्यूटनचे गतीचे नियम|तिसऱ्या नियमाप्रमाणे]] F<sub>1</sub> व F<sub>2</sub> ही बले समान मापांची व विरुद्ध दिशांमध्ये असतात. G हा [[गुरुत्व स्थिरांक|वैश्विक गुरुत्व स्थिरांक]] आहे आणि r हे दोन्ही वस्तुमानांमधील अंतर आहे]]
१६८७ मध्ये न्यूटनने 'प्रिन्सिपिया' ह्या ग्रंथात वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची परिकल्पना मांडली. त्यच्या स्वतःच्या शब्दांत:
<blockquote> मी असा तर्क केला की जी बले ग्रहांना आपल्या गोलकात ठेवतात, ती बले परिक्रमणाच्या केंद्रापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात नक्की [असावी]: आणि या प्रकारे मी चंद्राला पृथ्वीभोवतीच्या गोलकात ठेवायला लागणाऱ्या बलाची तुलना पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षणाशी केली; आणि त्याचे नीटनेटके उत्तर मिळाले.<ref>चंद्रशेखर, सुब्रह्मण्यन (२००३). न्यूटन्स प्रिन्सिपिया फॉर द कॉमन रीडर (Newton's Principia for the common reader). ऑक्सफर्ड: ऑक्सफर्ड विद्यापीठ मुद्रणालय. (pp.1–2).</ref></blockquote>