"शंकर वासुदेव किर्लोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
== जीवन ==
शंकर किर्लोस्करांचा जन्म ८ ऑक्टोबर, इ.स. १८९१ रोजी [[सोलापूर]] येथे झाला. त्यांचे वडील वासुदेव किर्लोस्कर सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. किर्लोस्कर कुटुंबियांचेकुटुंबीयांचे स्नेही असणाऱ्या चित्रकार [[श्रीपाद दामोदर सातवळेकर|श्रीपाद दामोदर सातवळेकरांमुळे]] लहानग्या शंकरासही चित्रकलेची गोडी लागली. पुढे त्यांनी [[पुणे|पुण्याच्या]] डेक्कन कॉलेजात दाखला घेतला. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी [[लाहोर|लाहोरास]] श्रीपाद दामोदर सातवळेकरांकडे जाऊन रीतसर चित्रकला शिकायला सुरुवात केली व कालांतराने त्यांना मुंबईच्या [[सर जे.जे. कलाविद्यालय|सर जे.जे. कलाविद्यालयात]] वरच्या वर्गात प्रवेशही मिळाला<ref name="लोकसत्ता२०१००३१७"/>.
 
शिक्षणानंतर ते [[किर्लोस्करवाडी]]स आले. तेथे त्यांचे चुलते [[लक्ष्मणराव किर्लोस्कर]] यांनी स्थापलेल्या किर्लोस्कर कारखान्यात जाहिरातीची सूत्रे ते सांभाळू लागले. कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने इ.स. १९२० साली त्यांनी ''किर्लोस्कर खबर'' नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. इ.स. १९२९ साली [[विनायक दामोदर सावरकर|विनायक दामोदर सावरकरांच्या]] सूचनेवरून ''किर्लोस्कर खबर'' हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव ''किर्लोस्कर'' असे ठेवण्यात आले<ref name="लोकसत्ता२०१००३१७"/>