"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३९:
ह्या पद्यानुसार पृथ्वी मध्ये आकर्षणाची शक्ती आहे. ह्या शक्तीमुळे ती भारी वस्तूंना आपल्याकडे खेचते व ह्यामुळेच वस्तू जमिनीवर पडतात. व पुढे म्हटले आहे की अंतराळातल्या वस्तूंमध्ये समान आकर्षण शक्ति असेल तर ते सर्व कुठेही 'पडू' शकत नाहीत. <ref>http://www.homebusinessandfamilylife.com/support-files/weclaimtheseareindiandiscoveries.pdf</ref>
 
==== केप्लरचाकेप्लरचे नियम आणि गुरुत्वाकर्षण ====
१५७४ मध्यमध्ये टिको ब्राहे ह्या खगोलशास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेल्या ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणाचा सखोल अभ्यास करून केप्लरने प्रथमच ग्रहांच्या कक्षांबद्दलचे नियम सूत्ररूपाने मांडले आणि सप्रयोग सिद्ध केले. ते नियम खालीलप्रमाणे आहेत:
# सर्व ग्रहांच्या कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या लंबवर्तुळाच्या एका नाभिबिंदुवर (focus) असतो.
# ग्रह व सूर्य यांना जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळामधून फिरते.
# दोन ग्रहांच्या परिभ्रमणकाळांच्या वर्गांचे गुणोत्तर त्यांच्या कक्षांच्या प्रमुख अक्षलांबींच्या घनांच्या गुणोत्तराएवढे असते.
केप्लरपूर्वी [[निकोलस कोपर्निकस]] ह्याने [[सूर्यमाला]] सूर्यकेंद्रित असल्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्याप्रमाणे पृथ्वीची व इतर ग्रहांची कक्षा सूर्याभोवती वर्तुळाकाराची होती. केप्लर ने ह्या कक्षा लंबवर्तुळाच्या आहेत अशी संकल्पना मांडून् सर्व ग्रहांना एकसारखे लागू होणारे असे हे नियम बनवले.<ref>http://www.infoplease.com/encyclopedia/science/kepler-laws-development-kepler-laws.html</ref> केप्लरचे असे मत होते की सूर्याच्या कोणत्यातरी 'रहस्यमय' शक्तीमुळे ग्रहांची कक्षा टिकून राहते. त्याच्या असे ही ध्यानात आले की ग्रह जेव्हा सूर्यापासून लांब असतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो, व म्हणूनच ही शक्ती वाढणाऱ्या अंतराबरोबर कमी होत असणार. ह्याच संकल्पनेत न्यूटनने पुढे सुधारणा केली. <ref>http://www.infoplease.com/encyclopedia/science/kepler-laws-kepler-foretelling-law-gravity.html</ref>
 
==== गॅलिलिओची संकल्पना व प्रयोग ====