"अश्विनी (नक्षत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १७:
आपण ज्या प्रमाणे या नक्षत्राचा समावेश मेष राशीमध्ये करतो. मेष म्हणजे मेंढा, त्याच प्रमाणे पाश्चात्यांनी देखिल या तारकासमुहास ऐरीस (मेंढा) हेच नाव दिले आहे. ग्रीक पुराणामध्ये या मेंढ्यासंबंधी एक कथा आढळते.
 
थेबिसचा राजा अस्थमस याला फ्रिक्सर आणि हेले ही दोन मुले होती. पण या मुलांची सावत्र आई इनो त्यांना फार जाच करी. देवांचा दूत मर्क्युरी याला एक दिवस कळले की इनो आपल्या दोन्ही सावत्र मुलांना ठार मारणार आहे. तेव्हा मर्क्युरीने एक सोनेरी केसांचा मेंढा या दोन्ही मुलांना वाचविण्यासाठी पाठविला. दोन्ही मुलांना घेऊन हा मेंढा आकाशात उडाला पण वाटेत येणार्‍यायेणाऱ्या एका समुद्रावरून जाताना हेलेच्या हाताची पकड सुटली व तो समुद्रात कोसळला (हे ठिकाण म्हणजे दादा नेल्सची समुद्र धुनी. अजूनही ते ठिकाण हेलिस्पॉट म्हणून ओळखले जाते.) फ्रिक्सर मात्र काळ्या समुद्राच्या किनारी सुखरूप उतरला. आपल्या सुटकेसाठी देवाचे आभार म्हणून तो मेंढा त्याने देवाला बळी दिला व त्याची सोनेरी लोकर तिथल्या राज्याला भेट दिली. ही ग्रीक पुराणकथा अजूनही फार प्रसिद्ध आहे.
 
खरेतर 'वसंतसंपात' बिंदू (आयनिकवृत्त व खगोलीय विषुववृत्त यांना जोडणारे स्थान) ज्या राशीमध्ये असेल ती पहिली रास अथवा ज्या नक्षत्रास असेल ते नक्षत्र प्रथम मानावे. साधारणात ज्यावेळेस कलगणनेस सुरुवात झाली त्याकाळी 'वसंतसंपात' बिंदू अश्विनी नक्षत्रामध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये होता. परंतु पृथ्वीच्या परांचन गतीमुळे हा बिंदू सरकत-सरकत सध्या रेवती नक्षत्रामध्ये (मीन राशीमध्ये) आला आहे. म्हणजे नक्षत्र गणना रेवती नक्षत्रा पासून करावयास हवी. पण काही कारणांमुळे हा बदल करावयाचा राहून गेला. म्हणून अश्विनी नक्षत्र व मेष राशीचा अग्रक्रम कायम राहिला.