"मृग (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: jv:Orion
ओळ ५:
 
== बाह्य दुवे ==
REFRENCE BY :--- http://www.avakashvedh.com/bharatiya/nakshatra05.html
 
सर्वसाधारण अवकाश निरीक्षण न करणार्‍या व्यक्तीने देखिल हा तारकासमूह आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी पाहिलेला असतोच. कारण या नक्षत्राचा आकारच काही असा आहे की अवकाशात ह्या नक्षत्राकडे प्रत्येक निरीक्षक अथवा व्यक्ती थोडावेळ तरी पाहतच राहतो.
 
'मृग' म्हणजे हरीण, ह्या नक्षत्राचा आकार त्याच्या नावाप्रमाणेच आढळतो. पुढे दोन व मागे दोन तारका त्याचे पुढील व मागील पाय असल्याचे सुचवितात. पुढील दोन तारकांमध्ये असलेला एक छोटासा तारकापुंज मृगाचे शीर (डोके) असल्याचे सुचवितो. ह्या मृगाच्या चार प्रमुख तारकांच्या मध्यभागी तीन ठळक तारका अशा काही सरळ रेषेत आहेत की बघताना असे वाटते की त्या हरणास बहुदा बाण लागला असावा तर बाणाच्या खालील बाजूस असलेल्या तीन-चार तारका ह्या मृगाची शेपटी असल्याचे भासतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या नक्षत्रामध्ये असलेल्या तारकांचा आकार तंतोतंत मृगाच्या आकाराशी जुळत असल्यामुळेच कदाचित ह्या नक्षत्राचे नाव मृगशीर्ष असे पडले असावे.
 
एखाद्या अमावास्येच्या निरभ्र रात्री जर आकाशाचे निरीक्षण केल्यास आपणास आपल्या आकाशगंगेचा चंदेरी पट्टा आपल्या डोक्यावरून गेलेला दिसतो. हा पट्टा मृगशीर्षाच्या अगदी जवळून गेलेला आढळतो.
 
आपल्या पौराणिक साहित्यामध्ये ह्या मृगा विषयी एक कथा आढळते. एकदा प्रजापती आपलीच कन्या रोहिणीच्या सौंदर्यावर भाळला. त्याच्या या अनुचित वर्तनाने सर्वच त्याच्यावर रागावले व रुद्र संतापाने प्रजापतीवर धावून गेला. तेव्हा रुद्रास घाबरून प्रजापतीने मृगाचे रूप घेतले व तो उंच आकाशात पळाला. मग रुद्राने देखिल व्याधाचे (शिकारी) रूप धारण केले व मृगाचा पाठलाग करू लागला. एका क्षणाला धावताना मृगाने आपला मार्ग बदलून उत्तरेकडे पळू लागला आणि त्याच क्षणाला व्याधाने मारलेला बाण मृगाच्या शरीरात घुसला.
 
या कथेचा संदर्भ जर प्रत्यक्ष आपणास पाहावयाचा झाल्यास उन्हाळ्यामध्ये जर आपण रात्री अवकाश निरीक्षण केल्यास आपणास आढळेल की ह्या मृगाचे तोंड नेहमी उत्तरेकडे असते व त्याच्या शरीरामध्ये घुसलेल्या बाणाच्या रेषेत खाली आपणास एक तेजस्वी तारा आढळेल. तोच व्याध तारा.
 
 
दुसर्‍या एका ग्रीक कथेनुसार ह्या नक्षत्रास शिकारी व त्याच्या शेजारी असलेल्या व्याधाच्या तार्‍यास त्या शिकार्‍याचा कुत्रा अशी उपमा दिलेली आढळते. या शिकार्‍याचे नाव 'ओरायन' ह्या ओरायनने (Orion) जगभर सर्वश्रेष्ठ शिकारी म्हणून कीर्ती मिळवली. परंतु नंतर त्यास आपल्या कीर्तीचा गर्व झाला व त्यास त्याच्या गर्वाबद्दल शिक्षा म्हणून टुनो या ग्रीक देवतेने ओरायनवर एक विंचू सोडला. अखेर विंचवाच्या दंशामुळे ह्या सर्वश्रेष्ठ शिकार्‍याचा मृत्यू झाला. 'डायना' ह्या दुसर्‍या ग्रीक देवतेने ह्या विंचवास ओरायन पासून दूर व विरुद्ध बाजूस आकाशात स्थान दिले. तो विंचू म्हणजे बारा राशीतील वृश्चिक रास. ह्या राशीचा आकार तंतोतंत विंचवाशी मिळतो.
 
पण तसे पाहता ग्रीक कथेपेक्षा आपल्या येथील कथेत व या नक्षत्राच्या मांडणीत बरेच साम्य आढळते. या नक्षत्रातील वरच्या दोन तार्‍यांपैकी पूर्वेकडील तार्‍याचे नाव काक्षी (बिटलग्युज) व खालच्या दोन तार्‍यांपैकी पश्चिमेच्या तार्‍याचे नाव राजन्य (रिगेल) असे आहे.
 
मृग हा बहुदा सर्वात प्राचीन काळापासून परिचित तारकासमूह असावा. खाल्डियनांना हा इ. स. पूर्व २००० किंवा त्यापूर्वीपासून माहीत असावा. ते त्याला तामूझ म्हणत. सिरियन व अरब लोकांनी त्याचे नाव दैत्य (जायंट) असे ठेवले. तर इजिप्शियन लोकांनी त्याला बालसूर्यदेव मानून त्याचे नाव होरस ठेवले.
* {{संकेतस्थळ|http://www.avakashvedh.com/bharatiya/nakshatra05.html|अवकाशवेध - मृग नक्षत्राची माहिती|मराठी}}