"विनायक पांडुरंग करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २९:
भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फूट उंचीचा भव्य पुतळा घडवून ,असा एकसंघ पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पातील विशेष वैशिष्ट्ये मानली जातात.
==जीवन==
करमरकरांचा जन्म इ.स. १८९१ साली महाराष्ट्रातील रायगड जिल्हयातील सासवणे इथे झाला. समुद्रकिनारी वसलेल्या या गावातच त्यांच्या वडिलांचा [[गणपती]]च्या मूर्ती बनवण्याचा उद्योग होता. त्यामुळे चित्र काढण्याचा नाद असलेल्या करमरकरांना मूर्ती घडवण्याचेही शिक्षण घरीच मिळालंमिळाले. गावातील देवळाच्या भिंतीवर त्यांनी काढलेले [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] चित्र पाहून ऑटो रॉथफिल्ड या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन त्यांना [[मुंबई]]च्या [[जे. जे. स्कूल ऑफ आर्ट]]मध्ये दाखल केले.
==व्यावसायिक कारकीर्द==
[[मुंबई]]च्या [[जे. जे. स्कूल ऑफ आर्ट]]मध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी [[कोलकाता| कलकत्ता]] इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळात त्यांनी [[रवींद्रनाथ टागोर]], [[चित्तरंजनदास]], [[महात्मा गांधी]], [[पी.सी. रे]] प्रभृतींची [[व्यक्तिशिल्प|व्यक्तिशिल्पे]] घडवली. त्यानंतर 'लंडन रॉयल अ‍ॅकेडमी'मध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्यावर त्यांना [[इटली]], [[फ्रान्स]], [[स्वित्झरलंड]] या देशांमधील कलाकृतींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. तसेच ब्राँझ कटिंग, 'स्टोन क्रशिंग' ही तंत्रेही आत्मसात करून १९२३ साली ते कलकत्यास परतले.
===व्यावसायिक यश===
इ.स. १९२४ साली कलकत्यातील ईडन गार्डनमध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्ट्‍स'च्या वतीने आयोजित केलेल्या प्रदर्शनात करमरकरांची 'शंखध्वनी' ही कलाकृती प्रदर्शित झाली आणि त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे त्यांनी मुंबईत [[देवनार]]ला स्टुडिओ उभारला. याच काळात [[पुणे|पुण्यातील]] 'मिलिटरी स्कूल' मधील छत्रपती महाराजांचा अश्र्वारुढ एकसंध 'पुतळा' [[ब्रॉन्झ]]मध्ये बनवायची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आणि त्यासाठी १९२५ साली ते मुंबईत आले. त्यानंतर मुंबईतच त्यांचे वास्तव्य कायम राहिले. 'एका पुतळयाची आत्मकथा' या आपल्या लेखात या अवाढव्य पुतळयाच्या निर्मितीची पूर्ण कहाणी करमरकरांनी वर्णन केली आहे. या आठ टन वजनाच्या आणि साडेतेरा फूट उंच पुतळयाच्या [[ओतकाम|ओतकामाचे]] कार्य मुंबईतील [[माझगाव डॉक]]मध्ये झाले. आपले सगळे तांत्रिक कौशल्य, अध्ययनशीलता, आत्मविश्र्वास पणास लावून आणि सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम करुनकरून त्यांनी ही शिल्पाकृती साकार केली, आणि इतका प्रचंड एकसंध पुतळा ब्रॉन्झमध्ये घडवणारे भारतातील समकालीन शिल्पकारांमधील ते पहिलेच शिल्पकार ठरले. हा पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्यात नेला गेला व १९२८ साली त्यांची स्थापना झाली. या स्मारकशिल्पामुळे करमरकरांची अग्रगण्य शिल्पकारांमध्ये गणना होऊ लागली.
 
या संस्मरणीय कामगिरीनंतर करमरकरांनी अनेक उत्तमोत्तम कलाकृती घडवल्या. [[विठ्ठलभाई पटेल]], [[आचार्य कृपलानी]], ऑटो रॉथफिल्ड यांच्या पुतळयांसह त्यांची 'मत्सगंधा', 'मोरू' ,'प्रवासी', नमस्ते' आदी शिल्पेही लक्षणीय ठरली. याव्यतिरिक्त करमरकरांनी भारतातील अनेक संस्थानिक व त्यांच्या घराण्यातील व्यक्तींचीही शिल्पे घडवली.