"पटकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
पटकी (कॉलरा)
आतड्याना होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. स्वत्पविराम चिन्हासारखा आकार असलेल्या व्हिब्रिओ कॉलेरी या जिवाणूमुळे पटकी हा रोग होतो. ज्या व्यक्तीना पटकीची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉल-याचा फैलाव होतो. कॉलरा या शब्दाचे मूळ भारतीय असावे. ग्रीक भाषेमध्ये कॉलरा या शब्दाचा अर्थ ‘पित्त’असा होतो. भारतातून उगम पावलेला हा रोग आता सर्व जगभर पसरलेला आहे. गंगा नदीच्या खो-यात कॉल-याचा इतिहास शेकडो वर्षे आहे. व्यापारी मार्गाने जमिनीवरून जलमार्गाने कॉलरा 1817च्या सुमारास रशियात व रशियामधून युरोपमार्गे उत्तर अमेरिकेमध्ये पसरला. गेल्या दोनशे वर्षामध्ये सातवेळा कॉल-याची साथ आली आहे. 1961 मधील इंडोनेशियातील साथ सातवी होती.
अन्ननलिकेमधील ‘व्हिब्रिओ कॉलेरी’ या जिवाणू संसर्गा मुळे होणा-याहोणाऱ्या तीव्र अतिसार मराठीमध्ये पटकी या नावाने ओळखला जातो. रोगाच्या लक्षणामध्ये तीव्र पाण्यासारखे जुलाब आणि उलट्यांचा समावेश होतो. पटकीची लागण दूषित पाणी आणि अन्नामधून होते. उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि विद्युत अपघटने (क्षार) यांची कमतरता ओढवून निर्जलीकरण होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वरित उपचार न झाल्यास मृत्यू ओढवतो. प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे क्षार आणि पाणी देणे आणि ते शक्य न झाल्यास सलाइनवाटे शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण पूर्ववत करावे लागते. 2010 मध्ये जगभरात सु साठ लक्ष व्यक्तीना पटकीची लागण झाली होती.त्यातील एक लाख तीस हजार व्यक्ती मरण पावल्या.
 
पटकीच्या जिवाणूंचा शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर एक ते पाच दिवसामध्ये भाताच्या पेजेसारखे जुलाब होतात. उपचार केले नाहीत तर एका दिवसमध्ये दहा ते वीस लिटर पाणी जुलाब आणि उलट्यावाटे शरीरातून बाहेर पडते. जुलाबास माशासारखा वास येतो. फक्त तीन टक्के व्यक्तीमध्ये पटकीची लक्षणे दृश्य स्वरूपात दिसतात. इतर व्यक्ती पटकीच्या वाहक असतात. वेळीच उपचार चालू केले नाहीत तर झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी होण्याच्या प्रकारास वैद्यकीय भाषेमध्ये जलशुष्कता (डीहायड्रेशन) असे म्हणतात. जलशुष्कतेमुळे रक्तदाब कमी होतो, नाडी वेगाने चालते, व्यक्तीचे डोळे खोल जातात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पटकी" पासून हुडकले