"लीळाचरित्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पंडित म्हाइंभट सराळेकर हा लीळाचरित्राचा (श्रीचक्रपाणी चरित्र) कर्ता आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व [[महानुभाव पंथ|महानुभाव]] वाङमयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ. स. १२७८.
 
==परिचय==
या ग्रंथात सुमारे साडेनऊशे ओव्या आहेत. एकांक-पूर्वार्ध-उत्तरार्ध असे या ग्रंथाचे तीन विभाग आहेत. [[चक्रधरस्वामी|श्रीचक्रधरांचे चरित्र]] हा या ग्रंथाचा विषय आहे. लीळाचरित्राच्या यशाचे निम्मेअधिक श्रेय श्रीचक्रधरांच्या व्यक्तिमत्त्वाला जाते.
 
तत्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र लीळाचरित्रात उमटलेले आहे. त्यावेळचा समाज, चालीरीती, व्रतवैकल्ये, सणवार, वस्त्रेप्रावरणे, खाणीपिणी, नाणीगाणी, व्यापारटापार इत्यादी विविध अंगांचे दर्शन, स्थितीगती याची चांगली कल्पना लीळाचरित्रातून येते. नागदेव, बाइसे, आउसे, सारंगपंडित, जानोपाध्ये इ. अनेक व्यक्तींची स्वभावचित्रे या ग्रंथात आहेत. चरित्रकार म्हाइंभट चतुरस्त्र, साक्षेपी, कष्टाळू, प्रामाणिक, भावनिष्ठ शैलीकार आहे. लीळाचरित्राची प्रेरणा नागदेवाचार्य - म्हाइंभट संवादात आहे. भाषा, इतिहास, साहित्य, समाजदर्शन, तत्त्वज्ञान या सर्वच दृष्टींनी या ग्रंथाचे महत्त्व जाणवते.
ओळ ८:
==भाष्य==
*डॉ. [[वि.भि. कोलते]]
==हे सुद्धा पहा==
* [[महानुभाव पंथ]]
* [[चक्रधरस्वामी]]
 
[[वर्ग:महानुभाव पंथ]]