"विकिपीडिया चर्चा:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६९:
 
::उत्तर देणे बाकी [[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २२:४२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
 
::>>हि चर्चा लावण्याचे मूळ उद्देश स्वच्छ आहेत का<<
::>>चर्चा लावण्याचा मूळ उद्देश सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या देण्यात येणारे अडथळे (गतिरोधक) दूर करणे हा पहिल्यापासून स्पष्ट आणि साफ आहे. संयोगाने पहिलाच गतिरोधक तुमचा येत असेल तर त्याला मी काय करु? -
:: तुम्हाला पहिला प्रतिसाद देतो मदतीचे हात देतो, त्यांना तुम्ही गतीरोधक म्हणता आहात ? (हे तुम्ही केवळ माझ्या बाबतीत नाही इतरांच्याही बाबतीत करता आहात ) .माझा आपल्याला जुना प्रतिसाद पहा:
 
::>>माझा जुना प्रतिसाद>>''नमस्कार आपण नोंदवलेला बग पाहीला, बग नोंदवण्याबद्दल पुढाकार घेतल्या बद्दल अभिनंदन. इंग्रजी व इतरही विकिपीडियातील इतरही चांगल्या सुविधा मराठी विकिपीडियावर आणण्यास पुढाकार घेतल्यास स्वागतच आहे.इंग्रजी शिवाय इतर भाषातील विकिपीडिया जसे जर्मन फ्रेंच इत्यादी सुद्धा वेग वेगळ्या सुविधा राबवून घेत असतात त्यांचे अध्ययन गुगलच्या ट्रांसलेशन सुविधेच्या आधारे करता येऊ शकते. नविन फळीतील/पिढीतील लोक पुढाकार घेत आहेत हे अधिकाधीक व्हावे म्हणजे मराठी विकिपीडियाची प्रगती अधिक वेगाने होईल''
 
::असा प्रतिसाद देणाऱ्याकडे सर्व सामान्यपणे कस म्हणून पाहिल जात ? आणि माझे मराठी विकिपीडीयातील माझे बहुसंख्य व्यक्तिंना बहुसंख्य वेळी प्रतिसाद सहाय्य देणारे आणि गोड भाषेतच आहेत.(माझी मत उभ करण्याची क्षमता या गोड भाषेनी विकिचौकटीत तयार झालेल्या सौहार्दपुर्ण मैत्री पर्यंतच मर्यादीत आहे, आणि आपला उद्देश "उद्देश सुविधा उपलब्ध करुन देणे " पर्यंत मर्यादीत आहे तर आपण इतर विषय का चघळलेत ?व्यक्तिद्वेष हा उद्देश नसेल तर , सभ्यपणे पार करता येणारे अडथळे पार पाडताना by hook or crook चा मार्ग कशामुळे ?)
 
 
::माझही अर्ध तप सॉफ्टवेअर कंपन्यातच गेल आहे ? मला काय येत आणि काय नाही ? काय आणि केव्हा मागावयास हव याच व्यवस्थीत भान मला आहे .एखादी व्यक्ति स्वत:च्या मर्यादा जाणून कबूल करते , झुकत माप घेते म्हणजे लगेच , नापास होते का काय ? सदसद विवेक बुद्धीने स्वत:च्या माहितीच्या मर्यादा कबुल जबाबदारिचे निर्वहन करण्याकरता माहिती मागणाऱ्यांना निर्बुद्ध ठरवता ? बुद्धी सर्वांनाच असते तशी मलाही आहे,उलटपक्षी तशी ती नसती तर उलट पक्षी तुम्हाला नसलेल्या अडथळ्यांचे भास झाले नसते. परिस्थिती नुसार प्रत्येकाला वेगवेगळे ज्ञान आणि exposure मिळालेले असते.
 
::माझे सोडा, संकल्प द्रविड विकिपीडियावर केव्हा होते आणि नव्हते याचे हिशेब मांडून तयार आहेत त्यांना आपण पुन्हा आठवण दिली होती काय ? त्यांनाही तुम्ही तुमच्या व्यक्तिद्वेषाचे शिकार केले आहे तेव्हा त्यांनाही वजा करू. तुमचे मित्रवर्य प्रचालक अभिजीत साठेजी अगदी या पानावरच्या चर्चेस तुम्ही सुरवात करून वेगळे वळण देई पर्यंत होतेच ना . आपला मुख्य उद्देश "सुविधा उपलब्ध करुन देणे " एवढाच मर्यादीत आणि स्वच्छ आहे तर प्रचालक अभिजीत साठेजींना विनंती करून पूर्ण करून घेता आला असता , चौकटीत चौकटी बाहेर आपण इतरही प्रचालकांशी संपर्कात असता त्या पैकी कुणाला कधी संपर्क करावा असे वाटले नाही ? मला वाटते तुम्ही ज्यांचा आद्य-व्यक्तिद्वेष करत त्या मंदाररावांनीही आपले काम बहुधा कोणतेही प्रश्न न विचारता केले असते का हे किमान गंमत म्हणून तरी तपासावयाचे होते.राहुल आणि मंदार आणि बहुधा अभिजीतजींनीही माझ्या सारखा आपणास नकोसा होणारा क्वालिटी चेकचा आग्रह धरला नसताच.
 
::आपण गतिरोधक काढण्यापुर्वी ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आश्वस्त करण्याचा शंका निरसनाचा करून घेता येईल का ? याचा अंधूकसा किरणसुद्धा का दडपत आहोत ? संतोषजी आपण सर्वांना सुविधेचे दागिने देऊ इच्छिता आहात, ते दागिने खुप सुंदर आहेत , यापुर्वी सुंदर लोकांनी घातले आणि आपल्या कडच्या वापरणाऱ्यांचे सौंदर्य खुलणारच आहे यात मला काही वाद नाही. मी दागिन्यातल सोन २४ कॅरटच असल पाहिजे त्यात तांब आहे का पितळ या कशाचीही चौकशी करत नाही आहे .फक्त आपण जे दागिने देतो आहोत ती तयार होताना त्यात काही हानीकारक त्वचेस लाख नाही हे तपासता येईल का ?बाकीचे लाखो लोक सोन्याचे कॅरेट लाख न पहाता वापरत असतील नसतील आपल्या गावात येणाऱ्या सोन्याची सोन्याच्या सुरक्षीत ठेवले जाण्याची काळजी संबंध गावानी घेतली तर फायदा कुणाचा? का सोन्याच्या सुरक्षेची काळजी घ्या म्हणणारा कोतवालच चुकीचा ? आयात होणाऱ्या गव्हा सोबत गाजर गवताच बियाण येत नाही आहे हे बघता येईल का ?माणसाला अन्न वस्त्र निवाऱ्या नंतर सुरक्षा सर्वात महत्वाची समजली जाते, जर तुम्ही इतके महिने आणि मी इतकी वर्ष एखाद्या गोष्टी शिवाय कळ काढली आहे तर संतोषजी उलटपक्षी आम्हाला हव आहे, जे हव आहे ते चांगल तपासून सुरक्षीत हव आहे अस तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून म्हणावयास हव होत .हे होऊ शकल नाही कारण 'सुविधा उपलब्ध करुन देणे' एवढा मर्यादीत न ठेवता व्यक्तिद्वेषाच्या काटेरी कुंपणाला हात घातलात .तेही ठिक पण व्याख्या '(सुरक्षीत)सुविधा उपलब्ध करुन देणे' अशी केली असतीत तर माझा मदतीचा हात समजणे अधीक सुलभ झाले असते.
 
(लेखन चालू )
Return to the project page "चावडी".