"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
(अशोक सराफ: Info edited)
 
==उल्लेखनीय==
अशोक सराफ यांचा अभिनय 'अष्टपैलू' या विशेषणाशिवाय शब्दात मांडणे कठीण आहे. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कार्याद्वारे घडविले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी [[दादा कोंडकें]] सारख्या जगमान्य विनोदवीराशी तोडिसतोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी [[पांडू हवालदार, चित्रपट|पांडू हवालदार]] मध्ये दाखविली तर [[कळत नकळत, चित्रपट|कळत नकळत]], [[भस्म, चित्रपट|भस्म]] यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. [[वजीर, चित्रपट|वजीर]] सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी हुबेहूब साकारली तर [[चौकट राजा, चित्रपट|चौकट राजा]] मधील सहृदय गणाच्या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळविले. ऐशीच्याऐंशीच्या दशकात [[लक्ष्मीकांत बेर्डे]] यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने [[अशी ही बनवाबनवी, चित्रपट|अशी ही बनवाबनवी]], [[धूमधडाका, चित्रपट|धूमधडाका]], [[दे दणा दण, चित्रपट|दे दणा दण]] यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला [[सचिन पिळगांवकर]], [[महेश कोठारे]] यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून [[नवरी मिळे नवर्‍याला, चित्रपट|नवरी मिळे नवर्‍याला]], [[आत्मविश्वास, चित्रपट|आत्मविश्वास]], [[गंमत जंमत, चित्रपट|गंमत जंमत]], [[आयत्या घरात घरोबा, चित्रपट|आयत्या घरात घरोबा]] पासून अलिकडच्या [[शुभमंगल सावधान, चित्रपट|शुभमंगल सावधान]] पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकाला खिळवून ठेवले. मराठी हृदयात मानाचं स्थान मिळविलेल्या अशोक सराफ यांचा अभिनयाचा प्रवास अजूनही अविरत चालूच असून अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या [[बृहन्महाराष्ट्र कन्वेंशन २००७]] येथे [[विजय केंकरे]] दिग्दर्शित [[हे राम कार्डिओग्राम]] या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे.
 
==कार्य==
२९४

संपादने