"सिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ३२:
वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजेमहाराजांचा छंद होता. [[जुनागड]]च्या नवाबाने मात्र विसाव्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णत: बंदी घातली. त्या काळी सिंहांची संख्या तेरावर आली होती, अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या शंभराच्या आसपास होती. ते काहीही असलं, तरी १९१० पर्यंतच्या काळात हे संकट ओळखलं गेलं, ही विशेष गोष्ट. साहजिकच त्यापुढे स्वातंत्र्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आलं आणि त्यादृष्टीने काही पावलं उचलली गेली. [[गुजरात|गुजरातेतलं]] गीर हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आलं. गीरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असंही संबोधलं जातं.
== वर्णन ==
१५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासुन आढळते. तो [[आशिया]] आणि [[आफ्रिका]]मध्ये आढळतो. सिंव्हाचे दोन प्रकार आहेत [[आफ्रिकेचा सिंह]] आणि [[आशियाचा सिंह]]. [[युरोपचा सिंह]] आणि [[बारबेरी सिंह]] हे सिंह आता नष्ट झाले आहेत. [[पांढरा सिंह]] हा [[दक्षिण आफ्रिका]]त मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतो. [[चितळ]], [[हरीण]], [[काळवीट]], [[नीलगाय]], [[रानडुक्कर]] यापैकी एखादं भक्ष्य चपळाईने पकडायचं, तरी कित्येकदा चारेक प्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते. पण एकदा पोटावर ताव मारला की दिवसातले वीसेक तास हे महाराज विश्रांती किंवा निद्रादेवीच्या आधीन होतात. सिंहीणीच्या शिकारीवरच सिंह जगतो, हे आफ्रिकन सिंहांच्या बाबतीत खरं असलं, तरी आशियातले सिंह त्याला अपवाद असतात. ते शिकार करतात, प्रसंगी शिकारीची चोरीही करतात.
* १५० ते २५० किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे.
 
* त्याचे अस्तित्व १०००० वर्षांपासुन आढळते.
* तो [[आशिया]], [[आफ्रिका]], [[दक्षिण अमेरिका]], [[युरोप]]मध्ये ही आढळतो.
* त्याचे सरासरी आयुष्य १० ते १४ वर्ष असते.
* ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात.
* एकट्याने राहण्यापेक्षा एखाद-दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतो.
* [[चितळ]], [[हरीण]], [[काळवीट]], [[नीलगाय]], [[रानडुक्कर]] यापैकी एखादं भक्ष्य चपळाईने पकडायचं, तरी कित्येकदा चारेक प्रयत्नांनंतर एक शिकार हाती लागते. पण एकदा पोटावर ताव मारला की दिवसातले वीसेक तास हे महाराज विश्रांती किंवा निद्रादेवीच्या आधीन होतात.
* सिंहीणीच्या शिकारीवरच सिंह जगतो, हे आफ्रिकन सिंहांच्या बाबतीत खरं असलं, तरी आशियातले सिंह त्याला अपवाद असतात. ते शिकार करतात, प्रसंगी शिकारीची चोरीही करतात.
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-4699096,prtpage-1.cms|महा्राष्ट्रटाइम|मराठी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंह" पासून हुडकले