"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३१७:
अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य,खेळ यासारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात.
या सोबतच ऑडियो व्हीज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.
 
 
===शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर===
 
मराठी सारस्वतात अक्षरसारथी म्हणून अनेक साहित्यिक आपले मोलाचे योगदान देत आहेत. मराठी वाड:मय संस्कृती टिकवण्यात, भरभराटीस आणण्यात साहित्यिकांच्या बरोबरच वाचकांचाही सहभाग अतिशय महत्वाचा आहे. वाचन संस्कृती रुजली पाहिजे, वाढली पाहिजे, हे ध्येय घेवून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर येथील शब्द प्रकाशन संस्थेच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नसलेला व केवळ कविता या विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रसिद्ध केला जातो. गेल्या १०४ वर्षाच्या दिवाळी अंक इतिहासातील संपूर्ण कवितेला वाहिलेला व जाहिरात विरहित वाचनाचा निखळ आनंद देणारा एकमेव दिवाळी अंक असावा असे आम्हाला वाटते. कविता सागर कदाचित हा पहिलाच असा अंक असेल जो कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती शिवाय आम्ही प्रसिद्ध करत आहोत. त्याच बरोबर कोणाकडूनही या कामासाठी अनुदान घेत नाही किवा देणगी साठी कोणाकडेही जात नाही.
 
उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ शब्द प्रकाशन संस्था, जयसिंगपूर यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव अंक कविता सागर - दर्जेदार वाचनीय मजकुराने सजलेला आहे. बहारदार कवितांनी नटलेला आहे. नामवंत साहित्यिकांच्या सहभागाने खुललेला आहे. मराठी प्रकाशन विश्वात इतिहास घडवणा-या कविता सागर दिवाळी २०१२ चा अंक आपल्या संग्रहात ठेवायलाच हवा. कविता सागर दिवाळी अंक तयार होत असताना ज्यांनी ज्यांनी बघितला ते म्हणाले कविता सागर सारखा दिवाळी अंक 'मराठीत आजवर झाला नाही'. कविता सागर अंक पहा आणि तुमचं तुम्हीच ठरावा, ते मत बरोबर कि चूक?
 
कोणत्याही स्वरूपाच्या जाहिराती नसलेला व फक्त केवळ कवितासाठी असलेला कविता सागर २०१२ चा दिवाळी अंक वाचकापर्यंत पोहचवायच काम मागच्या सहा महिन्याच्या अथक प्रयत्नाने साकार झाले आहे, संपादक व सल्लागार मंडळाचे अथक प्रयत्न सार्थकी लागले आहेत. त्यांनी जर मनावर घेतले नसते तर ह्या कविता कदाचित कवीच्या मनातच किवा डायरी मध्येच राहिल्या असत्या. काही कविता हवेत विरून गेल्या असत्या आणि कवीच्या मनातील भावना कुणाला कळल्याच नसत्या. कवी हा संवेदनशील असतो, त्यांच्या मनातील भावना थोडक्या शब्दात तो मांडतो. त्याच्या मनातला एखादा कोपरा कुठे तरी दुखावलेला किवा आनंदाने फुललेला असतो, त्यावेळी त्याला कविता स्फुरतात. अशा सर्वच कविता प्रसिद्ध होतात असे नाही. पण आज ‘शब्द प्रकाशन’ च्या वतीने अशा भावनांना एक संधी निर्माण करून दिलेली आहे, सर्वांचे एक हक्काचे व्यासपीठ तयार केलं आहे. कविता सागर दिवाळी अंक आपल्या हातात देत असताना आम्हाला आनंद होत आहे.
 
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हया मधून शेकडो कवींनी त्यांच्या निवडक कविता प्रकाशनार्थ पाठवल्या प्राप्त झालेल्या कविता मधून निवडक कविता या अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, ह्या पैकी काही उत्तम कविता व लेख महाजालावरून घेण्यात आलेले असून त्यांचे ऋण निर्देश व संदर्भ शक्य तिथे देण्यात आले आहेत. फक्त अभिजात साहित्य प्रसिद्ध व्हावे आणि नवोदितांनी खितपत पडावे हा दृष्टीकोन योग्य वाटत नाही. शेवटी दर्जा कुणी ठरवायचा? समाजातल्या तथाकथित मुठभर उच्चभ्रू आणि अभिरुची संपन्न लोकांनी? समाजात अनेक वर्ग आहेत, या वर्गाचे जगण्याचे तत्वज्ञान, त्यांचे संघर्ष, त्यांची स्वप्ने हि एकमेकापासून भिन्न असतात, व काहीवेळा परस्पर विरोधीही असतात. त्यामुळे प्रत्येक वर्गाच्या अंतरीच्या आवाजाला समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे असे आम्हास वाटते. ज्या जंगलात वाघ, सिंह, लांडगे, व तरस राहतात, त्याच जंगलात हरणे, ससे, वानरे, माकडे व खारी पण राहतात. त्यांच्या जगण्याचा मुलभूत अधिकार जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे आहे प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळणे.
 
कवी मनातील सर्व संवेदना आपल्या कवितेमधून मांडत असतो. कविता हे केवळ व्यक्तीगत रडगाणे नसते, तर ती आजूबाजूच्या वास्तवाचाही उलगडा करीत असते. कवी हा एकाच वेळी जळत असतो आणि फुलत ही असतो. जीवनातल्या अनुभवाची अत्यंत कमी शब्दात सार्थ मांडणी करण्याचे सामर्थ्य केवळ कवी मध्येच असते. ही गोष्ट लक्षात घेवून जास्तीत जास्त नवकवींना कविता सागर दिवाळी अंका मधून प्रसिद्धी देण्यात आली आहे, कविता सागर नियतकालीकाच्या भविष्यातील अंकामधून हजारो कवीसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जात आहे.
 
जर इतिहास अमर करायचा असेल तर काव्य हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण काव्यात गोडी असते. ताल, सूर, लय असतात, जे मनावर खोल परिणाम करतात. काव्य मृदु असते, काव्यात सौंदर्य असते, माधुर्य असते, शृंगार असतो, विरह असतो, शौर्य असते पण कौर्य नसते. काव्यात कोणत्या भावना व्यक्त होतात यावर काव्य प्रकार ठरवतात. ‘जे न देखे रवि ते देखे कवी’ - या उक्तीप्रमाणे कवी आपल्या प्रतिभेने ह्या विश्वाच्या पलिकडे जावून विचार करू शकतो आणि नवनिर्माणाची आस जगवतो. हा अंक ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर काढत असल्यामुळे आम्ही लेखनासाठी मानधन देऊ शकलो नाही हे नम्र पणे नमूद करत आहोत. त्याच बरोबर “कविता सागर” दिवाळी अंक बुक गंगा डॉट कॉम / www.bookganga.com च्या माध्यमातून संपूर्ण जगात जिथे कुठे मराठी माणूस असेल त्या प्रत्येक ठिकाणावरून फक्त एका क्लिक वर वाचता येणार आहे.
 
जाहिराती शिवाय निखळ वाचनाचा आनंद देणारा दिवाळी अंक तयार करणे हा आमचा एक आगळा वेगळा उपक्रम होता व त्यात आम्ही सलग सहा महिन्याच्या मेहनती नंतर यशस्वी झालो आहोत. या नव्या प्रयोगात आपली मोलाची साथ लाभली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. कदाची या उपक्रम साठी केलेला खर्च आम्हाला मिळेल अथवा नाही हे काही सांगू शकणार नाही परंतु कविता सागर दिवाळी अंकाच्या निर्मितीतून आम्हाला आनंद मिळाला व नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आपल्या सारख्या महान व्यक्तींचा परिचय झाला हे हि नसे थोडके.
 
या अंकात १२४ कवींच्या २०४ कविता व १३ काव्य विषयक लेख छापले आहेत. १२४ कवी पैकी ९०% कवींची पहिली कविता कविता सागर मध्ये छापून आली आहे. ख-या अर्थाने हा उपक्रम नव कवींसाठी वरदान ठरला आहे. आपल्या अनमोल मार्गदर्शन व सहका-याच्या पाठबळावर अशाच स्वरूपाचा कविता सागर गुढी पाडवा विशेषांक प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. या नव्या स्वरूपातील अंकासाठी कृपया आपले काव्य विषयक साहित्य पाठवावे.
 
 
===संदर्भ===