"अतिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''अतिसार''' (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो.
अतिसार म्ह्णजे अन्न्नलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल. वैद्यकीय व्याख्या याहून थोडी वेगळी आहे. प्रगत देशामधील व्यक्ती दररोज सरासरी तीनवेळा शौचास जाते. वैद्यकीय व्याख्येनुसार तीनशे ग्रॅम हून अधिक शौच म्हणजे अतिसार. यातील 60-65 टक्के पाणी असते. या व्याख्येनुसार अतिसार म्हणजे शौचास अधिक वेळा जावे लागणे किंवा शौच स्वत:च्यास्वतःच्या नियंत्रणाशिवाय अधिक वेळा जाणे.
अतिसार डॉकटरांच्या म्हणण्यानुसार तीव्र अतिसार एक आठवड्यांचा आणि दीर्ध म्हणजे 2-3 आठवड्यांचा. विषाणुजन्य आणि जिवाणूजन्य संसर्ग हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे.
 
वर्णन- बहुतेक रुग्णामध्ये अतिसार हा मर्यादित उपद्रव आहे.पण जागतिक पातळीवर संसर्गजन्य अतिसाराचा गंभीर परिणाम होतो. दरवर्षी पन्नास लक्ष व्यक्ती अतिसारामुळे मरण पावतात. तिस-या जगात मरण पावणा-यामध्ये पाच वर्षाखालील मुले अधिक असतात.
दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. आर्थिकआणि सामाजिक परिणाम होतात ते वेगळेच. आतड्यांचे रोग, अन्ननलिका दाह, आणि इतर लवकर बरे न होणा-याहोणाऱ्या आजारामध्ये अतिसारामुळे पोषण संबंधी विकृति दिसू लागतात, मुलांची वाढ थांबते, प्रतिकार शक्ती कमी होते. अतिसाराचा सामाजिक परिणाम पाहिला म्हणजे कामाचे शेकडो तास वाया जातात.
 
'''कारणे आणि लक्षणे'''
ओळ ४५:
 
'''पर्यायी उपचार''' –
अतिसार कशामुळे झाला आहे हे शोधून त्यावर उपचार करण्याने शरीरातील महत्वाचेमहत्त्वाचे क्षार आणि पाणी शरीरातून बाहेर जाणे थांबते. पाण्याचे शरीरातून होणारे उत्सर्जन दीर्घकाळ चालू राहणे घातक आहे. पण त्याच वेळी शरीरात अनावश्यक असलेला घातक पदार्थ बाहेर जाणे हा घातक पदार्थ बाहेर टाकण्याचा आवश्यक मार्ग असू शकतो.
अतिसार बरा करण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे आतड्यातील जिवाणूची पूर्ववत वाढ करण्यास मदत करणे. आतड्यात लॅक्टोबॅसिलस असिडोफिलस, लॅ. बायफिडस, आणि सॅकॅरोमायसिस बोउलार्डी हे तीन यीस्ट कुलातील जिवाणू आतड्याच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहेत. प्रतिजैवेके संबंधी अतिसारामध्ये या तीन जिवाणूंची संख्या कमी झालेली असते. या जिवाणूंचा जैवौपचार पद्धतीत अतिसार नियंत्रणासाठी वापर होतो.
शरीरातील निघून गेलेल्या घटकांची भरपाई करणे अतिसारामध्ये तेवढेच आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्यानेशरीराची प्रतिकार यंत्रणा परत कार्यान्वित होते. शरीरातील झिंक (जस्त) कमी झाले असल्यास अतिसार दीर्घकालीन अतिसारामध्ये बदलतो. कुमारवयीन रुग्णामध्ये झिंक दिल्याने त्यांची वाढ पूर्ववत होते. भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही. ब्रॅट आहार दिल्याने आतड्यांची स्थिति पूर्ववत होते. ब्रॅट हे बनाना, राइस,अॅसपल आणि टोस्ट चे लघुरूप आहे. या चार पदार्थाच्या आहारावर अवलंबून असलेल्या रुग्णामध्ये विरधळणारे आणि न विरघळणारे तंतू, आतड्याचा दाह न होता आहारातून मिळतात. टोस्ट थोडा काळा किंवा अधिक ब्राउन भाजला तर जिवाणू विषे चारकोल मध्ये शोषली जाऊन शरीरातून बाहेर जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/अतिसार" पासून हुडकले