"अतिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ९:
अतिसारामुळे मोठ्या आतड्यामधून जेवढे पाणी शोषून घेतले जाते त्याहून अधिक बाहेर पडते. दररोज जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे त्याहून अधिक पाणी मोठ्या आतड्यात शोषून घेतले जाते. ज्या वेळी मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याची यंत्रणा कोलमडून पडते त्यावेळी अतिसार होतो.
अतिसार बहुघा संसर्ग किंवा अशा आजाराचा परिणाम आहे जेथे द्रवाची निर्मिती किंवा शोषण यामध्ये बिघाड होतो. मोठ्या आतड्यातील काहीं द्रव्ये उदाहरणार्थ मेद आणि पित्त आम्ले जल शोषणामध्ये अडथळा आणतात. अशा वेळी अतिसार होतो. मोठ्या आतड्यातून एखादा पदार्थ जेंव्हा नेहमीपेक्षा वेगाने जातो त्यावेळी सुद्धा अतिसाराची लक्षणे दिसतात.
अतिसार संबंधी लक्षणे सामान्यपणे अन्न मार्गाच्या इजेशी जोडलेली आहेत. उदाहरणार्थ ताप, मळमळ, उलट्या, आणि पोटात दुखणे –वेदना. एका दिवसात वीस वेळा शौचास जावे लागणे अतिसाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. काहीं रुग्णामध्ये शौचावाटे रक्त किंवा पू जातो. शौचावाटे जाणा-या रक्तामुळे शौचाचा रंग काळा होतो. शौच फ्लशच्या पाण्यावर तरंगणे म्हणजे शौचामध्ये न पचलेले अन्न्द्रव्यअन्नद्रव्य शिल्लक आहे. अपचनामुळे बहुघा असे होते.
सर्वात नेहमीचे अतिसाराचे कारण म्हणजे जंतुसंसर्ग, (याला प्रवाशांचा अतिसार म्हणतात) अन्न विषबाधा, आणि औषधे. औषधामूळे होणारा अतिसार सामान्यपणे दुर्लक्षित राहतो. प्रतिजैविके आणि आम्लता विरोधी औषधामुळे ब-याच वेळा अतिसार होतो. अनेक कर्बोदक विरहित अन्नद्रव्यामध्ये ना पचणारा भाग असतो. अशामुळे अतिसार होतो.
दीर्घ मुदतीचा अतिसार आणि लघु मुदतीचा अतिसार याचे कारण (औषधे किंवा संसर्ग) एकच आहे. फक्त त्यांची लक्षणे अधिक दिवस राहतात. झालेला संसर्ग दीर्घ काळ टिकून राहतो. परजीवी मुळे झालेला संसर्ग (जिआर्डिया- आदिजीव संघातील प्राणी, आणि एडस) दीर्घकाळ राहतो.
ओळ ४३:
आतड्यांची हालचाल थांबावी यासाठी लोपरामाइड, डायफेनोक्झायलेट दीर्घकालीन अतिसारावर उपयोगी आहेत. त्यांचा वापर शरीराचे तापमान वाढले असेल किंवा शौचामधून रक्त पडत असेल तर मर्यादित आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर करू नये.
अतिसाराच्या लक्षणानुरूप आणि कारणाप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. अतिसारावर उपचार म्हणून इसबगोल घेतात. इसबगोल बियामधून बाहेर पडणा-या श्लेष्मामध्ये आतड्यातील पाणी शोषण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे शौच पातळ झाले असल्यास त्याची घनता वाढते. पित्त क्षार (बाइल सॉल्ट) तक्रारीमुळे अतिसार झाला असल्यास कोलिस्टेरामिन देण्यात येते. कमी मेद /तेले असलेले अन्न किंवा पचण्यास सुलभ तेले असलेले अन्न काहीं रुग्णाना श्रेयस्कर ठरते. काहीं आजारात नवी अतिसार प्रतिबंधक औषधामुळे आतड्यामधील अन्नामधील पाणी जाणे थांबवते. काहीं रुग्णाना लॅक्टोजसारख्या घटकामुळे अतिसार होतो. अशी लॅक्टोज असले ली औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावीत.
 
'''पर्यायी उपचार''' –
अतिसार कशामुळे झाला आहे हे शोधून त्यावर उपचार करण्याने शरीरातील महत्वाचे क्षार आणि पाणी शरीरातून बाहेर जाणे थांबते. पाण्याचे शरीरातून होणारे उत्सर्जन दीर्घकाळ चालू राहणे घातक आहे. पण त्याच वेळी शरीरात अनावश्यक असलेला घातक पदार्थ बाहेर जाणे हा घातक पदार्थ बाहेर टाकण्याचा आवश्यक मार्ग असू शकतो.
Line ४८ ⟶ ४९:
शरीरातील निघून गेलेल्या घटकांची भरपाई करणे अतिसारामध्ये तेवढेच आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्यानेशरीराची प्रतिकार यंत्रणा परत कार्यान्वित होते. शरीरातील झिंक (जस्त) कमी झाले असल्यास अतिसार दीर्घकालीन अतिसारामध्ये बदलतो. कुमारवयीन रुग्णामध्ये झिंक दिल्याने त्यांची वाढ पूर्ववत होते. भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही. ब्रॅट आहार दिल्याने आतड्यांची स्थिति पूर्ववत होते. ब्रॅट हे बनाना, राइस,अॅसपल आणि टोस्ट चे लघुरूप आहे. या चार पदार्थाच्या आहारावर अवलंबून असलेल्या रुग्णामध्ये विरधळणारे आणि न विरघळणारे तंतू, आतड्याचा दाह न होता आहारातून मिळतात. टोस्ट थोडा काळा किंवा अधिक ब्राउन भाजला तर जिवाणू विषे चारकोल मध्ये शोषली जाऊन शरीरातून बाहेर जातात.
लहान मुलामध्ये आणि बालकामध्ये होमिओपॅथीच्या औषधाने अतिसारावर चांगला परिणाम होतो.
 
'''पूर्वानुमान'''-
अतिसाराचे कारण पूर्वानुमानाशी संबंधित आहे. सुधारित देशामध्ये अतिसाराच्या , संसर्गजन्य अतिसाराच्या कारणाने आजारी पडणे हे सामान्य व्यक्तीस असह्य होते. औद्योगिक आणि विकसनशील देशामध्ये अतिसाराचे गंभीर परिणाम होतात. वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यू ओढवतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/अतिसार" पासून हुडकले