"ग्रंथालयशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
==पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मुलांचे ग्रंथ संग्रहालय==
{{कामचालू}}
 
{{पुनर्लेखन}}
{{जाहीरात}}
बालसाहित्य हे बालकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले जाते आणि हे अनमोल साहित्य बालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जयसिंगपूर येथील मुलांचे ग्रंथ संग्रहालय यांनी पुढाकार घेवून पालक, शिक्षक, लेखक, प्रकाशक, वितरक यांच्या सहकार्याने पार पडत आहेत. साहित्य संस्कृती टीकविण्यासाठी बालकामध्ये साहित्यविषयक जागृती होणे गरजेचे आहे. मानवाच्या जडण घडणीत साहित्याच्या मोठा वाट आहे.
 
अलीकडं पुस्तक प्रदर्शनं खूप सुंदर असतात. हजारो पुस्तकं मांडली जातात. विशेष म्हणजे ग्राहकांना काही सवलतीही दिल्या जातात. गावोगावी अशी प्रदर्शनं भरत आहेत. अगदी ग्रामीण पातळीवरसुद्धा ती पोचू लागली आहेत. प्रदर्शनात जाऊन ग्रंथ खरेदी करणारा एक मोठा वर्गही तयार होतो आहे. वाचणारे कमी झाले, असं सरधोपट विधान करून चालत नाही. कारण वाचकांनी वाचन न थांबवता फॉर्म बदलला आहे. पुस्तकाकडून तो स्क्रीनकडं निघाला आहे. तरुणांचंही असंच आहे. तरुण तर खूप वाचतात. जुनी पिढी आणि नव्या पिढीच्या वाचनाचे विषय वेगळे आहेत. जुनी पिढी ‘श्यामच्या आई' कडं जाईल, ‘ययाती' कडं जाईल, तर नवी पिढी ‘आय सायबर्ग' कडं जाईल, ‘मॅनेजमेंट गुरू' कडं जाईल. नव्या पिढीचं पर्यावरण बदललंय, भावविश्व बदललंय, हे जसं खरं तसं आपल्याकडं अव्वल, अस्सल जन्माला येण्याचं प्रमाणही कमी होत आहे. तीन पिढ्यांना समोरासमोर उभं करून विचारा, आवडीची पुस्तकं कोणती? उत्तरं कदाचित समान येतील. ययाती, स्वामी वगैरे, वगैरे... याचा अर्थ असाही होऊ शकतो, की सर्वच पिढ्यांना आकर्षित करणारं नवं खूप कमी जन्माला येतंय... तरुण वाचत नाहीत, असा निष्कर्ष काढणं काही बरोबर नाही... तरुणांसाठी भरपूर काही येत असतं बाजारात... अर्थात, त्यातील प्रत्येक गोष्टीला साहित्य म्हणता येईल की नाही, हा ही प्रश्न आहेच...
 
 
मुले टी. व्ही. पाहतात ही जुनी तक्रार आहे. अशावेळी पालकांनी मुलांना मार्गदर्शन केले पाहिज. मुलांना उत्स्फूर्त होऊ द्या, त्यांना कुणाची नक्कल करायला लावू नका. चेहरा हसरा ठेवा, दुसर्याचे नीट ऐका, नीट बोला, चुका कबूल करा आणि आयुष्याचे प्लॅनिंग करा ही पंचसूत्री मुलांनी आत्मसात करायला हवी.
 
पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुलांसाठी एकही चांगले ग्रंथालय / वाचनालय नव्हते. जयसिंगपूर येथील प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांच्या परिवाराने मुलांचे ग्रंथ संग्रहालयाच्या रुपाने पुस्तकप्रेमी रसिकांसाठी एक अमुल्य ठेवा उपलब्ध करुन दिला व वाचन संस्कृती जोपसण्यासाठी एक पाउल उचलले. ग्रंथालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. जयसिंगपूर शहरासह इचलकरंजी व सांगली येथून सभासद या सेवेचा लाभ घेत आहेत. अत्यल्प मासिक वर्गणी, दर महिन्याला नविन पुस्तकांची खरेदी, मुलांची मासिके / साप्ताहिके / वर्तमान पत्रे व तसेच लहान मुलांमध्ये टी. व्ही. / काँम्प्युटर / व्हि. डी. ओ. गेम्स ऐवजी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी भरपूर प्रमाणात पुस्तके मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार पुस्तके व मासिके उपलब्ध असलेले समृद्ध ग्रंथालय जयसिंगपूर मधील नागरीकासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
३३,१२७

संपादने