"भारूड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५:
भारूडाचे साधारणपणे '''भजनी भारूड''', '''सोंगी भारूड''' आणि '''कूट भारूड''' असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तना सारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो. जसे संतांच्या 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.
==आजचे स्वरूप==
एकनाथमहाराजांनी ८५०४५० वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रुपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.
 
==सादरीकरण==
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादन ही करावे लागते. भारुडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यायाबरोबरच [[नाट्यकर्मी]] ही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच जन मनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य भारुडांनी केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हटले जाते. [[मराठी]] संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी [[भागवत]], [[ज्ञानेश्वरी]], गाथा, [[अमृतानुभव]] अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/भारूड" पासून हुडकले