"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १०:
 
स्त्री अभ्यास केंद्राने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. या केंद्रामध्ये १९९५ पासुन पदव्युत्तर पातळीवर सर्टिफिकेट कोर्स चालू झाला आहे. २००२ पासुन सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रात पदविका अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे. 2009 पासुन केंद्राने स्ती-अभ्यास क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम ही सुरु केला आहे. क्रांतिज्योती स्त्री-अभ्यास केंद्र पुणे विद्यापिठाच्या आवारात स्थित असून. आपल्या नवनिर्मितीस व सर्वोत्तमते साठी प्रसिद्ध आहे. पुणे शहरास स्त्री-प्रश्नाच्या राजकिय जाणिवेचा प्रदिर्घ वारसा आहे. महात्मा फ़ुले आणि सावित्रीबाई फ़ुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा ह्याच शहरात १८४८ ला सुरु केली. सावित्रीबाई फ़ुले ह्या आधुनिक भारतातील प्रथम स्त्री-शिक्षिका म्हणुन ओळखल्या जातात. तेव्हापासुन विधवा पुर्नविवाहाचा प्रश्न असो किंवा शिक्षणासंदर्भातील वादविवाद असतील , पुणे शहर हे कायमच केंद्रस्थानी राहिलेले आहे. पंडीता रमाबाईंचे शारदासदन, महर्षी कर्वे यांच्या शिक्षणसंस्था ह्या सर्वांचे मुलस्थान हे पुणे शहरच आहे. थोडक्यात केंद्राचे नाव आणि पुणे शहरातील त्याच्या वास्तव्यातून खूप काही घेण्या सारखे असून विविध शक्यतांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यही आले. १९८७ साली पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात विद्यापिठ अनुदान आयोगाच्या सहाय्याने स्त्री अभ्यास केंद्र सुरु करण्यात आले. १९९७ पासून केंद्रास स्वायत्त दर्जा देण्यात आला. केंद्रास भारतातील सर्व स्त्री-अभ्यास केंद्रातील प्रगत अश्या ६ केंद्रामधील एक गणले गेले. भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहायाने एकूण ६० स्त्री-अभ्यास केंद्र कार्यरत आहेत. [http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/academic.htm पुणे विद्यापीठ संकेतस्थळ]
==अध्यापक==
 
शर्मिला रेगे, ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका असणार्या नंतर, स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या आणि १९९१ नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातिवरील संशोधनामध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्वाचे बदल झाले.[http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/faculty.htm स्त्री-अभ्यास् अध्यापक्]
==संशोधन==
महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांची कामे, महाराष्ट्रातील दलित आणि भटक्या-विमुक्त समाजातील स्त्रियांचे प्रश्न, महाराष्ट्राचा जात- वर्ण- लिंगभेद संदर्भातील सामाजिक इतिहास (१८५० - १९५०) हे विषय केंद्राने संशोधनासाठी निश्चित केले आहेत.