"नोबेल पारितोषिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''नोबेल पारितोषिक''' हा जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा [[पुरस्कार]] आहे. [[रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक|रसायनशास्त्र]], [[भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|भौतिकशास्त्र]], साहित्य, [[नोबेल शांतता पुरस्कार|जागतिक शांतता]], [[वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक|वैद्यकशास्त्र]] किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा [[पुरस्कार]] दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक [[आल्फ्रेड नोबेल]]ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले. <br />
ऑक्टोबर २००६ पर्यंत एकूण ७६३ व्यक्तींना ७८१ नोबेल [[पुरस्कार]] देण्यात आले आहेत.
== पार्श्वभूमी ==
आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी ही पारितोषिके दिली जातात. ही पारितोषिके जगात सर्वोच्च सन्मानाची समजली जातात. आल्फ्रेड नोबेल याच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजेच [[१० डिसेंबर]], [[इ.स. १९०१]] पासून ही पारितोषिके देण्यास आरंभ झाला. भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान (वैद्यक), साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन (शांतता) या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दिली जातात.