"ताओ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ताओ वा दाओ (चिनी: 道; पिन्यिन: Dào) ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्...
(काही फरक नाही)

१६:००, ३ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

ताओ वा दाओ (चिनी: 道; पिन्यिन: Dào) ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो. पारंपरिक चिनी तत्त्वज्ञानधर्म यांच्या संदर्भात ताओ ही ज्ञानमीमांसीय संकल्पना असून लाओझीपासून उद्भूत झालेल्या या संकल्पनेने एका धर्माला (Wade–Giles, Tao Chiao; Pinyin, Daojiao) आणि तत्त्वज्ञानाला (Wade–Giles, Tao chia; Pinyin, Daojia) जन्म दिला. या दोहोंना ताओ मत असे म्हटले जाते.