"दिवाळी अंक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ १६:
या स्पर्धेत उत्कृष्ट संपादन, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट छपाई, खास मुलांसाठी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक, विनोदी साहित्य, उत्कृष्ट कादंबरी, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, उत्कृष्ट मुलाखत, उत्कृष्ट कविता, हास्यचित्रे, ई दिवाळी अंक, सामाजिक दिवाळी अंक, ध्वनीफिती, ध्वनीचित्रफिती, ब्रेललिपी, अनियतकालिक, शिक्षण विषयक, समाज प्रबोधन आणि उत्कृष्ट मुखपृष्ट अशा 20 प्रकारामध्ये 20 पुरस्कार स्मृती चिन्हाच्या स्वरुपात देण्यात येतील. साहित्य जगतात आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा पुरस्कार मानाचा समाजाला जातो. केलेल्या कामाची पसंती आणि पोचपावती म्हणून मिळणा-या पारितोषिकांचे स्वरूप वेगवेगळे असते. काही पारितोषिके स्थानिक पातळीवर तर काही पारितोषिके जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची समजली जातात. या पारितोषिकांनी सन्मानित
ओळ ११८:
== दिवाळी अंक विश्वकोश साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ==
मराठी संस्कृतीला भरभरून देणाऱ्या दिवाळी अंकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्या करिता व दिवाळी अंकांच्या वैश्विक पातळीवरील संवर्धनासाठी जयसिंगपूर येथील “अलिशा अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज” च्यावतीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात. शंभराहून अधिक वर्षाची दिवाळी अंक परंपरा ही खास मराठी अभिरुचीचे प्रतीक आहे. मनोरंजनापासून सुरू झालेला दिवाळी अंकाचा प्रवास आज वेगवेगळ्या विषयावर विशेष अंक काढण्यापर्यंत आला आहे. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ मध्ये 'मनोरंजन' मासिकाचा दिवाळी अंक प्रसिद्ध केला आणि आजच्या दिवाळी अंकाच्या समृद्ध वाटचालीला सुरुवात झाली. दिवाळी अंकाचा हा प्रवास अतिशय समृद्ध असा आहे. दिवाळी अंकाची परंपरा अखंड राहावी व त्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी या सदहेतूने ’दिवाळी अंक विश्वकोश‘ ची
अलिशा अॅडव्हर्टायझिंग एजन्सीजने आयोजित केलेल्या खास आंतरराष्ट्रीय विनाशुल्क खुल्या मराठी दिवाळी अंक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर अलिशा अॅडव्हर्टायझिंग एजन्सीजने ‘दिवाळी अंक विश्वकोश’ मंडळाची स्थापना, प्रसिद्ध कवी अनिल दुधाट (पाटील) यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे. त्याद्वारे साहित्य विश्वातील सर्व विक्रम तोडणारा “दिवाळी अंक विश्वकोश” संपूर्ण जगाला मराठी संस्कृतीची ओळख करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ओळ १२९:
साहित्य क्षेत्रात दिवाळी अंकांचे स्थान मोठेच आहे. अनेक नामवंत लेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात दिवाळी अंकांमधूनच केली आहे, हे विसरता येणार नाही. मराठी साहित्यामध्ये दिवाळी अंकांचा प्रवाह कमी झाला नसून त्याचे स्वरूप बदलले आहे. केवळ कथा, कादंबऱ्या, कविता इतक्यापुरतेच हे अंक मर्यादित राहिले नसून अनेक विषयांना ते स्पर्श करीत आहेत. साहित्य चळवळ पुढे जाण्यासाठी दिवाळी अंकांचा वाटा मोठा आहे, यात शंका नाही. दिवाळी अंकांचा उपक्रम कितीही अडचणी आल्या तरी अनेकजण चालवत असतात. मराठी दिवाळी अंक आता सातासुद्रापार गेलेत . अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्विर्त्झलंड, ऑस्ट्रेलिया आणि दुबई येथे दिवाळी अंकांना सर्वात जास्त मागणी आहे. अंध लोकांसाठी ब्रेल लिपीतील दिवाळी अंक हे त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण ठरले आहेत. अंध मुलांना साहित्य वाचायला मिळावे. त्यांची जगाशी ओळख व्हावी, या विचाराने हे अंक ब्रेल लिपीत काढण्यात येतात, मुख्य म्हणजे पूर्वीसारखे हे काम किचकट राहिलेले नाही. तंत्रज्ञानाच्या मदतीने असे अंक काढणे सहज शक्य झाले आहे.
सर्वसाधारणपणे दिवाळी अंकाच्या किमती ११ रुपया पासून ६०० रुपया पर्यंत आहेत, तर पृष्ठे ८ पासून ४८० पर्यंत आहेत. काही दिवाळी अंकांची छपाई अतिउत्तम असून कागदही चांगल्या प्रतीचा वापरला जातो. मराठी साहित्यात दिवाळी अंकांना अनन्य साधारण
दिवाळीला जशी नवीन कपडे, सोने, वस्तू, घरांची खरेदी ठरवून केली जाते तसेच दिवाळी अंक आवर्जून विकत घेणारे वाचकही असतात. एरवी पुस्तकांना हात न लावणारे देखील दिवाळीच्या दिवसात एखादा अंक वाचतात. तर दर्दी वाचकांचा दिवाळी अंकांचा ब्रॅण्ड ठरलेला असल्यामुळे त्या ब्रॅण्डशिवाय त्यांची दिवाळी पूर्णच होत नाही. १०३ वर्षाची गौरव शाली परंपरा असलेले दिवाळी अंक हे वाचन संस्कृतीचे अविभाज्य घटक बनले आहेत. परंतु दर वर्षी नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या शेकडो दिवाळी अंकांची साधी यादी सुद्धा कुठेच उपलब्ध नाही, जी सूची काही
या दिवाळी अंक विश्वकोश मध्ये दिवाळी अंक, स्थापना, कमाल मूल्य, किमान मूल्य, कमाल पृष्ठे, किमान पृष्ठे, पुरस्कार / सन्मान, वेगळेपण, प्रकाशन संस्था, संस्थापक, मुख्य संपादक, कार्यकारी संपादक, प्रकाशक, मुद्रक, मुद्रणालय, वितरक, नामवंत लेखक, नामवंत कवी, मुखपृष्ठ, मुखपृष्ठा वरील व्यक्ती इत्यादी प्रमुख विभाग असतील व त्या अनुषंगाने संबंधित दिवाळी अंकांची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली जाईल. हा एक संग्राह्य विश्वकोश ठरावा व सर्वांनी त्याचा एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग करावा असा निर्मितीकार डॉ. सुनील पाटील यांचा प्रयत्न आहे.
भारतीय संस्कृतीमधील शिखर उत्सव असलेला दीपावलीचा सण आणि त्यानिमित्ताने समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे दिवाळी अंक आपल्या संस्कृतीचा एक भाग बनून राहिले आहेत. तथापि त्याची दाखल घेणे, मूल्यमापन करणे व प्रोत्साहन देणे या बाबी तितक्याच अवघड आहेत. तथापि अनेक संस्था हे
ज्या संपादक / प्रकाशक यांना या ’दिवाळी अंक विश्वकोश‘ मध्ये आपल्या दिवाळी अंकांची माहिती प्रसिद्ध करावयाची इच्छा असेल त्यांनी अलिशा अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज चे कार्यकारी संचालक प्राचार्य डॉ. सुनील पाटील, सुदर्शन पॅलेस, प्लॉट # १६, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड, नांदणी नाक्याजवळ, माय स्कूलच्या पाठीमागे, जयसिंगपूर तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, पिन - ४१६१०१ यांच्याशी दूरध्वनी क्रमांक ०२३२२ २२५५०० / ९९७५८७३५६९ किंवा alishaadvertisingagencies@gmail.com वर संपर्क साधावा. असे आवाहन अलिशा अॅडव्हर्टायझिंग एजन्सीजच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आलेले आहे.
ओळ १६५:
कविताचे संकलन हा पहिला टप्पा आहे. ‘एका वेळेस एक पाऊल’ या पद्धतीने काम करायचे असल्यामुळे आता फक्त कविताचे संकलन सुरू आहे. दुसऱ्या बाजुला मराठी कवींची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. ती यादी समोर ठेऊन कोणत्या कवीच्या कविता आलेल्या नाहीत ते पाहिले जाईल आणि ज्या कविता आलेल्या नसतील त्या मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून पाचशे किवा त्या पेक्ष्या अधिक कविता एकाच दिवाळी अंकात उपलब्ध करून दिल्या जातील. कविता फक्त मराठी भाषेतलीच असावी असे काही बंधन नाही.
जास्त प्रमाणात दर्जेदार लिखाण आल्यास निवडीत दर्जा चांगला असूनही, काही कविताची निवड न होणे शक्य आहे. निवडीचे निकष कोणताही पक्षपात न करता ठरवले व पाळले जातील व चांगल्या कवितांना न्याय द्यायचा प्रयत्न नेहमीच राहील. प्रकाशनासाठी आलेल्या कवितांची निवड तज्ञ व जाणकार कवीच्या समिती द्वारे केली जाईल. शब्द प्रकाशन संस्थेकडे पाठवावयाच्या आपल्या कविता पूर्वी कुठेही प्रकाशित न झालेल्या व स्वलिखित असल्या बद्दलची लेखी हमी कवींनी देणे आवश्यक आहे. हा अंक ना नफा ना तोटा या
शब्द प्रकाशन संस्थेने प्रकाशनासाठी न स्वीकारलेले साहित्य कोणत्याही परीस्थितीत कवीला परत पाठविले जात नाही. त्यामुळे कवींनी प्रकाशनाकडे पाठविलेल्या आपल्या साहित्याची एक प्रत
|