"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
 
==पुरस्कार==
 
दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनादिन साजरा होतो. या दिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०१३सालासाठी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार (प्रत्येक पुरस्कार ५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह) :
 
* [[श्री. ना. पेंडसे]] यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी वाङ्‍मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रा. [[सुरेश द्वादशीवार]] यांना विशेष पुरस्कार
* [[पु. ल. देशपांडे]] स्मृति कादंबरी पुरस्कार अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला
* शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृति कवितालेखन पुरस्कार प्रभू राजगडकर यांच्या 'निवडुंगाला आलेली फुलं' या काव्यसंग्रहाला
* समीक्षा वाङ्‍मयासाठी देण्यात येणारा कुसुमानिल स्मृति समीक्षा पुरस्कार डॉ. हेमंत खडके यांना त्यांच्या 'अर्वाचीन मराठी काव्यविचार' या ग्रंथासाठी
* बा. रा. मोडक स्मृति बालसाहित्य लेखन पुरस्कार डॉ. छाया कावळे यांना त्यांच्या ’बालकथा साहित्य : स्वरूप व चिंतन' या ग्रंथासाठी
* सुजाता लोखंडे यांना त्यांच्या 'माझं नर्सिंग' या पुस्तकासाठी अण्णासाहेब खापर्डे स्मृति आत्मचरित्र लेखन पुरस्कार
* नरेंद्र माहुरतळे यांना 'कार्गोची कणसं' या कथासंग्रहासाठी तसेच डॉ. सुरेश वर्धे यांना 'परिस्थितीला दिवस जातात तेव्हा' या ग्रंथासाठी नवोदित साहित्य लेखन पुरस्कार
* यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त ' यशवंतराव चव्हाण स्मृती विशेष पुरस्कार ' प्रा. कोमल ठाकरे यांना 'मधुकर केचे : साहित्य पंढरीचा वारकरी' या ग्रंथासाठी.