"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५५:
 
डोमगाव मठ परंपरेमध्ये पुढे [[सखाराम महाराज]] नावाचे सत्पुरुष होऊन गेले. रामदास>कल्य़ाण>मुद्गल>भिवाजी>महारुद्र>हनुमंत>सखाराम अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. त्यांनी कीर्तनांद्वारे रामदासी संप्रदायाचा प्रसार केला. संकेत कुबडी, लघुवाक्यवृत्ती इत्यादी ग्रंथांचे कर्ते हंसराजस्वामी हे यांचे जवळचे स्नेही होते. श्री सखाराम महाराज यांचा समाधीकाळ सन १८४०(?)आहे. त्यांची समाधी हैदराबाद येथे आहे. तसेच पुढे शंकराचार्य झालेले कल्याणसेवक महाराज तरुणपणी डोमगाव येथे साधनेसाठी राहिले होते. थोर समर्थभक्त अण्णाबुवा कालगावकर यांनी डोमगाव येथेच साधना करून साक्षात्कार करून घेतला. तसेच श्रीधर स्वामी यांच्या आई-वडिलांनी कल्याण स्वामी परंपरेमधील दत्तात्रेय स्वामींचा अनुग्रह घेतला होता. शंकर श्रीकृष्ण देव हे अनेक दिवस डोमगाव मठात येऊन राहिले होते. त्यांनी तेथून मूळ दासबोधाची शुद्ध प्रत लिहून घेतली व त्यावरून दासबोध प्रसिद्ध केला.
 
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना श्री तुकाराम चैतन्य महाराजांकडे पाठवणारे श्री रामकृष्ण स्वामी हे कल्याण स्वामी शिष्य परंपरेतील होते .हि परंपरा खालील प्रमाणे:-
समर्थ रामदास स्वामी -श्री कल्याण स्वामी-श्री बाळकृष्ण स्वामी-श्री चिंतामणी स्वामी -श्री रामकृष्ण स्वामी- श्री तुकाराम चैतन्य-श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज