"हेड्रियान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३७:
|}}
'''हेड्रियान''' (लॅटिन:''पब्लियस ट्रैनियस हेड्रियानस ऑगस्टस'';PVBLIVS AELIVS TRAIANVS HADRIANVS AVGVSTVS) ([[जानेवारी २४]], [[इ.स. ७६]]:[[इटालिका]], [[स्पेन]] किंवा [[रोम]], [[इटली]] - [[जुलै १०]], [[इ.स. १३८]]) हा [[इ.स. ११७]] ते मृत्यूपर्यंत [[रोमन सम्राट]] होता. [[नर्व्हा-अँटोनियन वंश|नर्व्हा-अँटोनियन वंशाच्या]] पाचांपैकी हा तिसरा सम्राट होता. आपल्या २३ वर्षांच्या सद्दीत याने रोममधील [[पँथियॉन]] परत बांधवले तसेच [[व्हिनस आणि रोमाचे देउळ]]ही बांधवले. हेड्रियानला मानवतावादी रोमन सम्राट मानले जाते.
 
हेड्रियानचा जन्म इटालियन वंशाच्या स्पॅनिश कुटुंबात [[सेव्हिया]]जवळील इटालिका या गावात झाला. हेड्रियानच्या काही चरित्रांमध्ये त्याचा जन्म रोममध्ये झाल्याचाही उल्लेख आहे. हा रोमन सम्राट [[ट्राजान]]च्या आतेभावाचा मुलगा होता.<ref>[http://www.forumromanum.org/literature/eutropius/text8.html Eutr. VIII. 6]: "...nam eum (Hadrianum) Traianus, quamquam consobrinae suae filium..." and [http://penelope.uchicago.edu/Thayer/L/Roman/Texts/Historia_Augusta/Hadrian/1*.html SHA, ''Vita Hadr''. I, 2]: ''...pater Aelius Hadrianus cognomento Afer fuit, consobrinus Traiani imperatoris.''</ref> ट्राजानने जरी आपला वारस जाहीर केला नसला तरी त्याची पत्नी [[पाँपैया प्लॉटिना]] हीने सांगितले की ट्राजान मृत्युशैय्येवर असताना त्याने हेड्रियानला आपला वारस घोषित केले होते. प्लॉटिना आणि ट्राजानचा मित्र [[लुसियस लिसिनस सुरा]] यांच्या सहाय्याने हेड्रियान रोमन सम्राटपदी आला.<ref>After A. M. Canto, in [http://www.ucm.es/BUCM/revistas/ghi/02130181/articulos/GERI0303120305A.PDF UCM.es], specifically pp. 322, 328, 341 and footnote 124, where she stands out SHA, ''Vita Hadr.'' 1.2: ''pro filio habitus'' (years 93); 3.2: ''ad bellum Dacicum Traianum familiarius prosecutus est'' (year 101) or, principally, 3.7: ''quare adamante gemma quam Traianus a Nerva acceperat donatus ad spem successionis erectus est'' (year 107).</ref>
 
आपल्या सत्ताकालादरम्यान हेड्रियान आपल्या साम्राज्याच्या प्रत्येक प्रांतात स्वतः गेला. ग्रीक विचारसरणीने प्रभावित झालेल्या हेड्रियानने [[अथेन्स]]ला आपल्या साम्राज्याची सांस्कृतिक राजधानी करण्यासाठी प्रयत्न केले व तेथे अनेक भव्य देउळेही बांधली. स्वतः सैनिकी पेशात असल्याने हेड्रियान सहसा सैनिकी वेशातच असे व प्रासादांमध्ये न राहता आपल्या सैन्याबरोबरच राहत असे. आपले सैन्य अधिक प्रबळ व्हावे यासाठी त्याने कवायती नेमून दिल्या. सैन्य कायम सतर्क रहावे म्हणून क्वचित तो स्वतःच शत्रू जवळपास आल्याच्या वावड्याही मुद्दामच उडवत असे.
 
सत्तेवर आल्यावर हेड्रियानने [[मेसोपोटेमिया]] तसेच [[आर्मेनिया]]वर ट्राजानने धाडलेले सैन्य परत बोलावून घेतले आणि डासिया प्रांतातूनही माघार घेण्याचा विचार केला. सत्ताकालाच्या उत्तरार्धात त्याने जुदेआमधील बार कोखबा उठाव मोडून काढला आणि जुदेआचे नामकरण सिरिया पॅलेस्टिना असे केले. स्वतः आजारी पडल्यावर हेड्रियानने [[लुसियस ऐलियस]]ला आपला वारसदार नेमले परंतु लुसियस अचानक वारला. त्यानंतर हेड्रियानने [[अँटोनियस पायस]]ला आपला वारसदार करण्याचे ठरवले व बदल्यात अँटोनियसने कबूल केले की तो लुसियस ऐलियसचा मुलगा [[लुसियस व्हेरस]]ला तत्पश्चात वारसदार नेमेल.
 
यानंतर थोड्याच दिवसांत हेड्रियान [[बैया]] येथे मृत्यू पावला.<ref>Royston Lambert, 1984, p. 175</ref>
 
{{विस्तार}}
 
{{संदर्भनोंदी}}
 
==बाह्य दुवे==
{{Commons}}
* [http://penelope.uchicago.edu/Thayer/E/Roman/Texts/Historia_Augusta/Hadrian/1*.html हिस्टोरिया ऑगस्टा:लाइफ ऑफ हेड्रियान (इंग्लिश मजकूर)]
* [http://www.wildwinds.com/coins/ric/hadrian/t.html हेड्रियानच्या नावाची नाणी]
* [http://www.newadvent.org/cathen/07104b.htm कॅथोलिक एनसायक्लोपिडीयावरील लेख (इंग्लिश मजकूर)]
 
{{रोमन सम्राट}}