"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८३:
[[जैन धर्म]], [[हिंदू धर्म]], हसिदी मत, [[तंत्र]] मार्ग, [[ताओ]] मत, [[ख्रिश्चन धर्म]], [[बौद्ध धर्म]] अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर; विविध पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू [[अद्वैत]] सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे. ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली तरी दोहोंच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे.
 
अनेक पाश्चात्त्य कल्पनांचाही ओशोंनी वापर केला. विरोधांचे ऐक्य ही त्यांची कल्पना हेराक्लिटसची आठवण करून देते, तर मानवाचे यंत्र म्हणून त्यांनी केलेले वर्णन [[सिग्मंड फ्राईड]] आणि [[गुर्जेफ]] यांच्यासारखे आहे. पारंपरिक संकेतांच्या पलीकडे जाणार्‍या "नवमानवा"ची त्यांची कल्पना नित्शेच्या ''बियाँड गुड अँड ईविल'' ची आठवण जागवते. लैंगिक मुक्ततेवरील त्यांचे विचार डी. एच. लॉरेंसशी तुलना करण्याजोगे आहेत तर गतिशील ध्यानपद्धती विल्हेल्म राइखच्या पद्धतीवर आधारलेली आहे.
===अहंकार आणि मन===
ओशोंच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मनुष्य हा उद्बोधनाची क्षमता असणारा, बिनशर्त प्रेमाची क्षमता असणारा, आयुष्याला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देऊ शकणारा [[बुद्ध]] आहे. अहंकारामुळे मनुष्याची क्षमता प्रत्यक्षात उतरत नाही. सामाजिक बंधनांमुळे मनुष्य जखडलेला राहतो. अन्यथा मनुष्य त्याच्या आंतरिक सामर्थ्याने एका झटक्यात परिघातून निघून केंद्रात शिरू शकतो आणि फुलाप्रमाणे फुलू शकतो.
ओळ १०२:
}}
क्रमांक ३, ७, ९ व १० या आज्ञा ओशोंनी अधोरेखित केल्या. ओशोंच्या चळवळीत ह्या आज्ञा निरंतर मार्गदर्शक ठरल्या आहेत.
 
==निवडक साहित्यकृती==
'''येशूच्या शिकवणीवर'''
"https://mr.wikipedia.org/wiki/ओशो" पासून हुडकले