"मीरा (कृष्णभक्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
No edit summary
ओळ ३५:
 
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणार्‍या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसर्‍या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तीप्रेमी' बनली. तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
 
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
 
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.