"राबिया बसरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
 
राबियाची एक प्रार्थना अशी आहे :
<blockquote>''"ईश्वरा! नरकाच्या भयाने मी तुला पूजिले तर मला नरकात जाळ,''</br>
''स्वर्गाच्या आशेने मी तुला पूजिले, तर मला स्वर्गातून काढून टाक,''</br>
''पण तुझ्याच खातर मी तुझी पूजा केली तर''</br>
''तुझे शाश्वत लावण्य देण्यास कुरकूर करू नकोस."''</blockquote>
 
==तत्त्वज्ञान==
दैवी प्रेमाचे तत्त्व सर्वप्रथम मांडण्याचा मान राबियाला जातो. तिचे मानले जाणारे बरेचसे काव्य अज्ञात उगमाचे आहे. कष्टमय आयुष्यानंतर अकस्मात तिला आत्म-साक्षात्कार झाला. शेख हसन अल-बसरीने तिला असा प्रश्न केला की, तिला हे गुपित कसे कळाले; तेव्हा ती म्हणाली : "कसेचे ज्ञान तुम्हाला आहे पण मला न-कसेचे ज्ञान आहे."
 
==चातुर्याच्या गोष्टी==
* एके दिवशी बसराच्या रस्त्यांवरून एका हातात मशाल आणि दुसर्‍या हातात पाण्याची बादली घेऊन राबिया धावत होती. ती काय करीत आहे, असे विचारल्यावर तिने सांगितले : "मला नरकाच्या आगी विझवायच्या आहेत आणि स्वर्गाची बक्षिसे जाळायची आहेत. या दोहोंमुळे ईश्वराचा रस्ता अडतो."
* राबिया प्रवचनाला न आल्यास हसन बसरी प्रवचनच देत नसत. यामागचे कारण देताना ते म्हणतात, "हत्तींसाठी ज्या पात्रांमध्ये औषध ठेवलेले आहे त्याच पात्रांमध्ये मुंग्यांसाठीचे औषध असू शकत नाही."
 
==संदर्भ==