"राबिया बसरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: राबिया अल-बसरी (अरबी : رابعة البصري) (ख्रिस्तपूर्व ७१७-८०१) ही [[मुस्लिम]...
 
ओळ ३:
==जीवन==
राबियाचा जन्म हिजरी सन ९५ ते ९९च्या दरम्यान झाला होता. तिच्या प्रारंभीच्या आयुष्याविषयीची माहिती फरिद अल-दिन अत्तार या नंतरच्या सुफी संत व कवीकडून मिळते. राबियाचे कोणतेही लिखित साहित्य उपलब्ध नाही.
तिच्या कुटुंबातील ती चौथी कन्या असल्याने "चौथी" या अर्थाने तिला राबिया हे नाव मिळाले होते. तिचे कुटुंब गरीब असले तरी समाजात त्याला मान होता. अत्तारच्या वर्णनानुसार राबियाचे पालक इतके गरीब होते की दिवा लावण्यासाठी त्यांच्याकडे तेल नव्हते आणि राबियाला गुंडाळण्यासाठी त्यांच्याकडे कापडही नव्हते. राबियाच्या आईने आपल्या पतीस शेजार्‍यांकडून तेल आणण्यास सांगितले पण त्याने निर्मात्याशिवाय इतर कुणाकडेही काहीही न मागण्याचा निश्चय केलेला होता. त्याने शेजार्‍याच्या घरी जाण्याचे नाटक केले आणि रिकाम्या हाताने परत आला.
 
त्या रात्री प्रेषित मोहम्मद राबियाच्या वडिलांच्या स्वप्नात आला आणि प्रेषिताने सांगितले की, "तुझी नवजात कन्या ईश्वराची लाडकी आहे आणि अनेक मुस्लिमांना ती योग्य मार्ग दाखवील. तू बसराच्या अमिराकडे जावेस आणि पुढील संदेश लिहिलेले पत्र त्याला द्यावेस : 'तू पवित्र प्रेषितास रोज रात्री शंभर वेळा आणि गुरुवारी रात्री चारशे वेळा दुरूद अर्पितोस. मात्र, तुझा हा नियम मागच्या गुरुवारी चुकल्याने शिक्षा म्हणून पत्रधारकास तू चारशे दिनार द्यावेस.'"
 
==संदर्भ==