"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८२:
 
===भय आणि आनंद===
सॅन दिएगो येथे १९७० मध्ये दिलेल्या वक्तव्यात कृष्णमूर्ती म्हणतात :
"भय कशाशी तरी संबंधित असते; ते स्वतःहून असत नाही. ... काल मला वेदना झाल्या, मला त्या उद्या नको आहेत. कालच्या वेदनांच्या स्मृतीचा समावेश असणारा विचार उद्या वेदना असण्याचे भय प्रक्षेपित करतो. म्हणून विचार भय आणतात. विचार भयाला जन्म देतात; विचार आनंदाचीही लागवड करतात. भय समजण्यासाठी आनंद समजणे आवश्यक आहे. ... भय आणि आनंद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."
 
===ध्यान===
ध्यानाकडे कृष्णमूर्तींनी महान कला म्हणून पाहिले. तंत्राशिवाय सराव करून ही कला शिकावी असे त्यांचे मत होते. खरे ध्यान म्हणजे "विचारांचा अंत" जो "काळापलीकडे...वेगळ्या मितीत" घेऊन जातो असे कृष्णमूर्तींचे मत होते. "ज्ञात गोष्टी काढून टाकून मन रिकामे करणे" म्हणजे ध्यान असेही त्यांनी म्हटलेले आहे.
 
===शिक्षण===
कृष्णमूर्तींनी जगभर अनेक शाळा काढल्या. शैक्षणिक लक्ष्ये म्हणून त्यांनी पुढील बाबी सांगितल्या होत्या :
# वैश्विक दृष्टी
# मानव व पर्यावरणाचा विचार
# शास्त्रीय दृष्टीचा समावेश असणारी धार्मिक चेतना
 
१९२८ मध्ये कृष्णमूर्ती व अ‍ॅनी बेझंट यांनी स्थापन केलेले कृष्णमूर्ती फाऊंडेशन अनेक शाळा चालविते. १९३४ साली वाराणसीत स्थापन झालेले राजघाट बेझंट स्कूल हे आरंभीच्या शाळांपैकी एक आहे.
 
===विश्व संकट===
कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्र्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत. स्वकेंद्रित क्रिया बाह्य दिशेने राष्ट्रवाद व धार्मिक असहिष्णुता म्हणून आविष्कृत होतात, विभाजित जग निर्माण करतात, अशा जगात विश्वासापोटी आपण एखाद्याला मारण्यास तयार होतो.
 
{{संदर्भनोंदी}}