"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६४:
 
<blockquote>"'सत्य ही मार्गरहित भूमी आहे.' कोणत्याही संस्थेतून, विश्वासातून, तत्त्वातून, यागातून, तात्त्विक ज्ञानातून किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने माणूस तिथे पोहचू शकत नाही. बौद्धिक विश्लेषण आणि अंतर्मुखीय विच्छेदनातून नव्हे तर संबंधांच्या आरशातून, स्वतःच्या मनाच्या विषयघटकांच्या आकलनातून, निरीक्षणातून त्याला ते शोधावे लागेल. सुरक्षिततेच्या भावनेपोटी मानवाने स्वतःमध्ये धार्मिक, राजकीय, वैयक्तिक प्रतिमा उभ्या केल्या आहेत. त्या प्रतिमा चिन्हे, आदर्श, श्रद्धा या माध्यमांतून आविष्कृत होतात. यांच्या ओझ्याचा माणसाच्या विचारांवर, संबंधांवर व दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडतो. प्रत्येक संबंधात माणसाला माणसापासून वेगळ्या करीत असल्याने त्या [प्रतिमा] आपल्या समस्यांचे मूळ आहेत." </blockquote>
 
१९७० च्या दशकात अनेक वेळा पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी कृष्णमूर्तींची भेट घेतली. या दोघांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ व काही वेळा गंभीर चर्चा झाल्या असल्या तरी कृष्णमूर्तींचा भारतीय राजकारणावरील प्रभाव अजून अज्ञातच आहे.
 
दरम्यानच्या काळात राजगोपाल व कृष्णमूर्तींमधील संबंध न्यायालयीन लढाईपर्यंत ताणले गेले होते. १९७१ मध्ये सुरू झालेले प्रताधिकारासंबंधीच्या आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण अनेक वर्षे चालले. कृष्णमूर्तींच्या आयुष्यकाळातच राजगोपालकडे असलेली कृष्णमूर्तींची पत्रे, हस्तलिखिते, दानस्वरुपात मिळालेली मालमत्ता, देणग्यांचे पैसे वगैरे बरीचशी सामग्री परत करण्यात आली. १९८६ मध्ये कृष्णमूर्तींच्या मृत्यूनंतर प्रतिस्पर्धी पक्षांनी हा प्रश्न निकालात काढला.
 
१९८४ व १९८५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणासाठी कृष्णमूर्तींना आमंत्रित करण्यात आले. नोव्हेंबर १९८५ मध्ये ते भारतात आले. जानेवारी १९८६ पर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी "निरोपाची" भाषणे दिली. कृष्णमूर्तींना नेहमी विचारण्यात आलेल्या प्रश्नांसोबतच यावेळी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा मानववंशावर काय परिणाम होईल याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. मृत्यूला मी आमंत्रित करू इच्छित नाही असे त्यांनी मित्रांना सांगितले होते पण शरीर किती काळ टिकेल (त्यांचे वजन खूप कमी झाले होते) याबाबत ते साशंक होते. बोलणे बंद झाल्यावर जगण्यास उद्देश उरणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. चार जानेवारी १९८६ रोजी मद्रासमध्ये त्यांनी दिलेले भाषण अखेरचे ठरले.
 
आपल्या वारशाबाबत कृष्णमूर्ती सजग होते. आपल्या शिकवणीचा अर्थबोधक कुणीही बनू नये अशी त्यांची इच्छा होती. मृत्यूपश्चात आपल्या सहकार्‍यांनी कृष्णमूर्तींचे प्रवक्ते किंवा वारसदार असल्यासारखे वागू नये असे त्यांनी कित्येकदा बजावून ठेवले होते.
 
मृत्यूच्या काही दिवस आधी केलेल्या वक्तव्यात त्यांनी आपल्याला काय झाले होते ते कुणालाही समजलेले नाही आणि आपली शिकवणही कुणाला कळालेली नाही असे म्हटले होते. आपल्या आयुष्यकाळात कार्यरत असलेली अफाट ऊर्जा आपल्यासोबत जाईल असेही त्यांनी म्हटले होते. "...शिकवण जगल्यास" लोक त्या ऊर्जेकडे जाऊ शकतील आणि आकलन करवून घेऊ शकतील असा आशावादही त्यांनी मांडला होता. चर्चांदरम्यान कृष्णमूर्तींनी आपल्या भूमिकेची तुलना [[टॉमस एडिसन]] व [[कोलंबस]] यांच्याशी केली होती. नव्या जगाच्या शोधासाठी कोलंबसाला कष्टमय प्रवास करावा लागला, त्याच जगात आज जेटने सहज जाता येते असे कृष्णमूर्ती म्हणाले होते. याचा अर्थ काही प्रमाणात कृष्णमूर्ती "खास" असले तरी त्यांच्या आकलनाच्या स्तरापर्यंत पोहचण्यासाठी इतरांना खास असण्याची गरज नाही असा लावता येतो.
 
स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८६ रोजी कृष्णमूर्तींचे निधन झाले.
 
==वारंवार चर्चिलेले विषय==
 
 
{{संदर्भनोंदी}}