"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४८:
<blockquote>कोणत्याही प्रकारची सत्ता, विशेषतः चिंतन व आकलनाच्या क्षेत्रातील सत्ता ही सर्वाधिक विनाशकारी, वाईट गोष्ट आहे. नेते अनुयायांचा नाश करतात व अनुयायी नेत्यांचा नाश करतात. तुम्हाला स्वतःच स्वतःचा शिक्षक व विद्यार्थी बनावे लागते. माणसाने मूल्यवान, आवश्यक म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही सवाल करावयास हवेत. </blockquote>
सोसायटीशी फारकतीनंतर संबंधित सर्व पदांचा कृष्णमूर्तींनी त्याग केला, दान म्हणून मिळालेल्या वस्तू व मालमत्ता ज्याच्या त्याला परत केल्या. उरलेले आयुष्य त्यांनी जगभरातील लोकांशी विश्वास, सत्य, दुःख, स्वातंत्र्य, मृत्यू यांच्या स्वरुपाबाबत व अध्यात्मसंपन्न आयुष्याबाबत चर्चा करण्यात व्यतीत केले. अनुयायी किंवा पूजकांचा त्यांनी स्वीकार केला नाही. गुरू आणि शिष्य या नात्यात अवलंबित्व व शोषण येते असे त्यांचे मत होते. आपल्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांकडून भेटवस्तू व आर्थिक मदतीचा त्यांनी स्वीकार केला आणि व्याख्यानमाला, लेखन या गोष्टी पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवल्या. त्यांनी लोकांना सतत स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त केले आणि विवक्षित विषयांबाबत चर्चेसाठी लोकांना आमंत्रित केले.
 
==मध्यायुष्य (१९३०-१९४४)==
कृष्णाजींचे मध्यायुष्य व्याख्यानदौर्‍यांमध्ये आणि प्रकाशनामध्ये गेले. ऑर्डर ऑफ द स्टारमधील एक मित्र आणि सहकारी असलेल्या देसिकाचार्य राजगोपाल (डी. राजगोपाल) याच्यासोबत त्यांनी स्टार पब्लिशिंग ट्रस्ट (एसपीटी) ही प्रकाशनसंस्था स्थापन केली. ओहायमध्ये आर्य विहार नावाच्या भवनात या काळी कृष्णमूर्ती, राजगोपाल आणि १९२७ मध्ये राजगोपालशी विवाहबद्ध झालेली रोझलिंड विल्यम्स हे राहत होते. 'एसपीटी'ची व्यावसायिक व संस्थात्मक बाजू डी. राजगोपाल सांभाळीत. कृष्णाजींचा वेळ भाषणे व ध्यान यांमध्ये जाई. राजगोपालचे वैवाहिक आयुष्य सुखमय नव्हते. १९३१ मध्ये राधा नावाच्या मुलीच्या जन्मानंतर राजगोपाल व रोझलिंड भौतिकदृष्ट्या विभक्त झाले. आर्य विहाराच्या सापेक्ष एकांतात कृष्णमूर्ती व रोझलिंड यांच्या दरम्यान असलेल्या निकट मैत्रीचे रुपांतर प्रेमप्रकरणात झाले. इ. स. १९९१ पर्यंत या संबंधांची जाहीर वाच्यता झाली नाही.
 
१९३० च्या दशकात यूरोप, लॅटिन अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचे दौरे कृष्णमूर्तींनी केले. १९३८ मध्ये हक्स्ले घराण्यातील आल्डस हक्स्ले या प्रसिद्ध लेखकाशी त्यांचा परिचय झाला. या दोघांमधील मैत्री अनेक वर्षे टिकली. युरोपात तेव्हा येऊ घातलेल्या संकटाबाबत दोघांनाही चिंता होती. राष्ट्रवादाच्या अपायकारक परिणामामुळे हे संकट उभे राहिले, असे या दोघांचेही मत होते. इ. स. १९४०-१९४४ या काळात कृष्णमूर्तींनी सार्वजनिक वक्तव्ये केली नाहीत. आर्य विहारात या काळात त्यांनी काम केले. बव्हंशी स्वयंपूर्ण असलेल्या आर्य विहाराने या काळात शिल्लक माल युरोपातील संकटग्रस्तांसाठी दिला.
 
मे १९४४ मध्ये ओहाय इथे भाषणमाला सुरू करून कृष्णमूर्तींनी सार्वजनिक मौन सोडले. 'एसपीटी'ची जागा घेतलेल्या कृष्णमूर्ती राइटिंग्ज इंकॉर्पोरेशनने (केडब्ल्यूआयएनसी) ही भाषणे व इतर साहित्य प्रकाशित केले. 'केडब्ल्यूआयएनसी'चे एकमेव उद्दिष्ट कृष्णमूर्तींच्या उपदेशाचा प्रसार करणे हे होते. भारतातील काही सहकार्‍यांच्या संपर्कात कृष्णमूर्ती होतेच. १९४७ च्या शिशिरात ते भारतात आले. अनेक तरुण बुद्धिवाद्यांना त्यांनी आकर्षित केले. या दौर्‍यातच पुपुल आणि नंदिनी या मेहता भगिनींचा कृष्णाजींशी संपर्क आला आणि त्या कृष्णमूर्तींच्या विश्वासू सहकारी बनल्या. [[ऊटकमंड]] इथे असताना कृष्णमूर्तींना पुन्हा 'प्रक्रिये'चा अनुभव आला तेव्हा मेहता भगिनी तिथे हजर होत्या.
 
या दौर्‍यात कृष्णमूर्तींना भेटावयास आलेल्या लोकांमध्ये तत्कालीन [[पंतप्रधान]] [[जवाहरलाल नेहरू]] यांचा समावेश होता. भेटींदरम्यान कृष्णमूर्तींनी विस्तारपूर्वक आपला उपदेश नेहरूंला दिला. एका भेटीत कृष्णमूर्ती म्हणाले होते : "स्वचे आकलन संबंधांमधूनच होते. ... स्व ज्याच्यात उघड होतो असा आरसा म्हणजे संबंध. आत्मज्ञानाशिवाय सम्यक विचार आणि कृतीसाठी अधिष्ठानच नाही." यावर नेहरूंनी "सुरुवात कशी करावी?" असा प्रश्न केला होता. यावर कृष्णमूर्तींनी "जिथे आहात तिथून सुरुवात करा. मनाचा प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्दसमूह, प्रत्येक परिच्छेद वाचा, कारण मन विचारांच्या माध्यमातून कार्य करते."
 
{{संदर्भनोंदी}}