"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७:
==आयुष्य बदलविणारे अनुभव==
१९२२ मध्ये कृष्णा व नित्या कॅलिफोर्नियाहून सिडनीला गेले. कॅलिफोर्नियात असताना क्षयरोगी नित्यानंदाच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून ओहाय खोर्‍यातील एका कुटिरात ते राहत होते. ओहायमध्ये या बंधूंना रोझलिंड विल्यम्स या अमेरिकन युवतीची मदत मिळाली. ओहायमधील काळात प्रथमच जिद्दू बंधू थिऑसॉफिकल सोसायटीच्या सभासदांच्या निरीक्षणाखाली नव्हते. हे ठिकाण जिद्दूंना आवडले. अखेर त्यांच्या अनुयायांनी एक विश्वस्त संस्था स्थापन करून हे कुटिर व सभोवतालची जागा विकत घेतली. मग हे स्थान कृष्णमूर्तींचे अधिकृत निवासस्थान झाले.
 
ओहायमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर १९२२ मध्ये कृष्णमूर्तींना काही आयुष्य बदलविणारे अनुभव आले. या अनुभवांना आध्यात्मिक जागृती, मानसिक परिवर्तन अशी विविध संबोधने दिलेली आहेत. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार १७ ऑगस्टला कृष्णाजींना मानेत तीव्र वेदना जाणवू लागल्या. पुढच्या दोन दिवसांमध्ये वेदना बळावल्या, त्यांना भूक लागेनाशी झाली आणि अधूनमधून असंबद्धपणे ते बरळू लागले. ते बेशुद्ध पडल्यासारखे दिसत असले तरी नंतर त्यांनीच सांगितल्यानुसार त्यांना भोवताल दिसत होता आणि त्या अवस्थेत गूढ ऐक्याचा अनुभवही त्यांना येत होता. पुढच्या दिवशी लक्षणांची व अनुभवांची तीव्रता वाढली आणि "असीम शांती"चा अनुभव त्यांना आला. यानंतर त्यांना जवळपास रोज रात्री 'प्रक्रिया' या नावाने ओळखले जाणारे अनुभव येऊ लागले. या अनुभवांमध्ये वेदना, शारिरिक कष्ट आणि संवेदनशीलता, बालकासारख्या अवस्थेत जाणे आणि काही वेळा त्यांचे शरीर वेदनांना शरण जाणे किंवा ते स्वतःच "निघून जाणे" अशा बाबींचा समावेश होता.
 
प्रक्रियेपासून वेगळे व "आशीर्वाद", "अमर्यादता", "पावित्र्य", "अनंतता" आणि सर्वाधिक वेळा "अन्यता" किंवा "अन्य" या संबोधनाने उल्लेखिले जाणारे काही अनुभव या काळात व नंतर कृष्णाजींना आले. ल्युटेंसच्या म्हणण्यानुसार हा "अन्यते"चा अनुभव जवळपास आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला आणि त्यांना संरक्षित असल्याची भावना देत राहिला.
 
इ. स. १९२२ पासून या गूढ अनुभवांची अनेक स्पष्टीकरणे मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. लेडबिटर व इतर थिऑसॉफिस्टांनी आपल्या 'माध्यमा'ला काही परामानसिक अनुभव येतील हे गृहीत धरले होते पण या अनुभवांनी तेही अचंबित झाले. नंतर कृष्णाजींनी केलेल्या चर्चांमधून या अनुभवांवर थोडासा प्रकाश पडला पण अंतिमतः शोधक दृष्टीने हाती काहीही लागले नाही. रोलंड व्हर्‌नॉन या चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया आणि लेडबिटरकडे नसलेल्या उत्तरांमुळे मोठा परिणाम घडून आला. कृष्णमूर्तींनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून काही पावले टाकली. भविष्यातील गुरू या भूमिकेसाठी ही प्रक्रिया हा आधारस्तंभ होता.
 
१९२५ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटी स्थापनेनंतरची पन्नास वर्षे पूर्ण करणार होती. या काळात कृष्णमूर्तींच्या मसिहासदृश व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या चर्चांना ऊत आला. थिऑसोफिकल सोसायटीत राजकारण सुरू झाले. अनेक सभासद आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याचे बोलू लागले आणि इतर अनेक त्यावर शंका घेऊ लागले. अशा घटनांमुळे खुद्द कृष्णमूर्ती मात्र मनाने सोसायटीपासून दूर गेले.
 
१३ नोव्हेंबर १९२५ रोजी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी नित्यानंदांचे [[शीतज्वर]] व क्षयाच्या प्रादुर्भावांमुळे निधन झाले. नित्यानंद आजारग्रस्त असले तरी त्यांचा मृत्यू अनपेक्षित होता. या घटनेमुळे कृष्णाजींचा थिऑसॉफीवरील व सोसायटीच्या नेत्यांवरील विश्वास उडाला. नित्यानंदांच्या तब्येतीबद्दल कृष्णाजींना वारंवार आश्वस्त केले जात होते. आपल्या जीवितकार्यासाठी नित्यानंदाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू होणार नाही असे अ‍ॅनीबाईंसह कृष्णाजींना वाटत होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या बातमीने कृष्णमूर्ती जवळपास कोसळले. नित्याच्या मृत्यूनंतर बारा दिवसांनी मात्र ते "अतिशय शांत, तेजस्वू आणि सर्व भावनांमधून मुक्त" झाल्यासारखे वाटले.
 
नित्यानंदांच्या मृत्यूमुळे "विश्वगुरूचे आगमन" वगैरे चर्चा बंद झाल्या.
 
==संदर्भ==