"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३:
जिद्दू कृष्णमूर्ती (११ मे १८९५ - १७ फेब्रुवारी १९८६) हे [[तत्त्वज्ञान]] व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्व गुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरूद त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता : मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्यान, अभिप्सा, मानवी संबंध व समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये [[क्रांती]] घडवून आणण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी सतत भर दिला आणि अशी क्रांती कोणत्याही बाह्य सत्तेद्वारा - मग ती धार्मिक, राजकीय वा सामाजिक असो - घडवून आणली जाऊ शकत नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले.
 
पौगंडावस्थेत असतानाच तत्कालीन मद्रासमधील [[अड्यार]] इथे असलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्यालयात विख्यात गूढवादी व उच्च कोटीचे ईश्वरविद (थिऑसफिस्ट) चार्ल्स वेब्स्टर लेडबीटर यांच्याशी कृष्णमूर्तींची भेट झाली. त्यानंतर [[अ‍ॅनी बेझंट]] व लेडबीटर या सोसायटीच्या तत्कालीन नेत्यांच्या देखरेखीखाली कृष्णमूर्ती वाढले. विश्वगुरू पदासाठी कृष्णमूर्ती लायक उमेदवार आहेत, अशी या नेत्यांची खात्री होती. नवयुवक कृष्णमूर्तींनी मात्र ही संकल्पना नाकारली आणि या संकल्पनेच्या समर्थनासाठी उभारलेल्या जागतिक संस्थेचे (''दी ऑर्डर ऑफ द स्टार'') त्यांनी विघटनविसर्जन केले. कोणतेही राष्ट्रीयत्व, जात, धर्म वा तत्त्वज्ञान कृष्णमूर्तींनी आपले मानले नाही आणि उरलेले आयुष्य जगभर प्रवास करीत व्यक्तींशी, छोट्या-मोठ्या गटांशी चर्चा करण्यात व्यतीत केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ''द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम'', ''दी ओन्ली रेवल्युशन'' आणि ''कृष्णमूर्तीज्‌ नोटबुक'' यांचा समावेश होतो. त्यांची अनेक भाषणे आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत. जानेवारी १९८६ मध्ये मद्रासमध्ये त्यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण केले. त्यानंतर महिनाभरात ओहाय (कॅलिफोर्निया) येथे त्यांचा मृत्यू झाला.
 
कृषणमूर्तींचे अनुयायी ना-नफा तत्त्वावर [[भारत]], [[इंग्लंड]] आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्नही त्यांचे समर्थक करीत आहेत.
 
==कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण==
कृष्णमूर्तींचा जन्म ११ मे १८९५ रोजी तत्कालीन [[मद्रास]] प्रांतातील (आताच्या आंध्र प्रदेशातील [[चित्तूर]] जिल्हा) मदनपल्ले या छोट्या नगरात तेलुगूभाषिक कुटुंबात झाला. आठवा मुलगा झाला तर कृष्णाचे नाव त्याला द्यायचे या [[हिंदू]] प्रथेनुसार कृष्णमूर्ती हे नाव ठेवण्यात आले. जिद्दू हे कुलनाम.<ref>ल्युटन्स (१९९५): Jiddu (alternately spelled Jeddu, Geddu or Giddu) was Krishnamurti's family name.</ref> कृष्णमूर्तींचे वडील जिद्दू नारायणैया हे वासाहतिक ब्रिटिश प्रशासनाच्या सेवेत होते. संजीवम्मा या आपल्या आईचा कृष्णमूर्तींना लळा होता पण ते दहा वर्षांचे असताना संजीवम्मांचा मृत्यू झाला. नारायणैया-संजीवम्मा या दांपत्याला एकूण अकरा अपत्ये झाली, त्यांपैकी पाच जणांचा बालपणातच मृत्यू झाला.
 
इ. स. १९०३ मध्ये जिद्दू कुटुंब [[कडप्पा]] इथे स्थिर झाले. त्याआधीच कृष्णमूर्तींना [[हिवताप]] जडलेला होता. अनेक वर्षांपर्यंत त्यांना हिवतापाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. संवेदनशील, आजारी, स्वप्नांच्या दुनियेत असणारे हे बालक मतिमंद आहे असे सर्वांना वाटे आणि त्यामुळे शाळेत शिक्षकांचा तर घरी वडिलांचा मार नियमितपणे कृष्णमूर्तींना खावा लागे.<ref>Lutyens (1975), pp. 3–4, 22, 25</ref> अठरा वर्षांचे असताना लिहिलेल्या आपल्या आठवणींमध्ये त्यांनी १९०४ मध्ये मृत्यू पावलेली आपली बहीण व १९०५ मध्ये मृत्यू पावलेली आपली आई "दिसली" अशा परामानसी अनुभवांचे वर्णन केलेले आहे.<ref> Lutyens (1983a), pp. 5, 309</ref> बालपणातच निसर्गाशी त्यांचे भक्कम बंध जुळले आणि हे बंध आयुष्यभर टिकले.
 
१९०७ मध्ये ब्रिटिशांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जिद्दू नारायणैया यांनी अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीत नोकरी धरली. रुढीप्रिय [[ब्राह्मण]] असण्याबरोबरच नारायणैया १८८२ पासून थिऑसॉफिस्टही होते. जानेवारी १९०९ मध्ये जिद्दू कुटुंब अड्यारला आले. थिऑसॉफिकल कुंपणाच्या बाहेर असलेल्या अस्वच्छ झोपडीत नारायणैया व त्यांचे पुत्र राहू लागले. सभोवतालच्या खराब परिस्थितीमुळे हे पुत्र कुपोषित बनले, त्यांना उवांचाही त्रास होऊ लागला.
 
==शोध==
एप्रिल १९०९ मध्ये लेडबीटर व कृष्णमूर्तींची पहिली भेट झाली. लेडबीटर हे आपल्याला अतींद्रिय दृष्टी असल्याचा दावा करणारे गृहस्थ होते. अड्यार नदीच्या किनारी हे दोघेही नेहमी जात. लेडबीटरच्या म्हणण्यानुसार कृष्णमूर्तींचे प्रभामंडल (ऑरा) त्यांनी पाहिलेल्या सर्वोत्तम प्रभामंडलांपैकी एक होते आणि त्यात स्वार्थाचा लेशही नव्हता. लेडबिटरच्या मते कृष्णमूर्तींमध्ये आध्यात्मिक गुरू व उत्कृष्ट वक्ता बनण्याची पात्रता होती. थिऑसॉफीतील एका सिद्धांतानुसार मानवजातीच्या उत्क्रांतीला दिशा देण्यासाठी एक प्रगत आध्यात्मिक शक्ती नियतकालाने पृथ्वीवर येते आणि विश्वगुरू म्हणून कार्य करते.<ref>Lutyens (1975), p. 21.</ref> हे सामर्थ्यही कृष्णमूर्तींमध्ये लेडबीटरला दिसले.
 
या "शोधा"नंतर अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांनी कृष्णमूर्तींना विशेष वागणूक देण्यास आरंभ केला. अपेक्षित विश्वगुरूपदासाठी "माध्यम" म्हणून कृष्णमूर्तींच्या शिक्षणाची, संरक्षणाची आणि तयारीची जबाबदारी लेडबिटर व त्याच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनी घेतली. कृष्णमूर्ती (यांना नंतर कृष्णाजी असेही म्हटले जाई) आणि त्यांचा धाकटा भाऊ नित्यानंद (नित्या) यांना खाजगी शिकवणी देण्यात आली व नंतर परदेशातील शिक्षणादरम्यान युरोपीय उच्चभ्रू समाजाशी त्यांचा परिचय करवून देण्यात आला. शाळेतील गृहपाठ पूर्ण न करू शकणारे आणि क्षमतांबद्दल व आरोग्याबद्दल अनेक अडचणी असणारे कृष्णाजी सहा महिन्यातच इंग्रजी बोलू आणि लिहू लागले. कृष्णाजींच्या मते लेडबिटरला लागलेला त्यांचा "शोध" ही त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारक घटना होती; अन्यथा लवकरच त्यांचा मृत्यू ओढवला असता.
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
{{विस्तार}}