"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (संतोष दहिवळने वाढविले: ar, bg, bo, bs, ca, cs, da, de, en, eo, es, et, fa, fi, fr, fy, he, hi, hr, hu, id, it, ja, ko, ml, mn, my, nl, no, pl, pt, ro, ru, sh, sk, sr, sv, ta, te, tr, uk, vi, zh, zh-classical
No edit summary
ओळ ७:
कृषणमूर्तींचे अनुयायी ना-नफा तत्त्वावर [[भारत]], [[इंग्लंड]] आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्नही त्यांचे समर्थक करीत आहेत.
 
==कौटुंबिक पार्श्वभूमी आणि बालपण==
जे. म्हणजे जिद्दू कृष्णमूर्ती यांचा जन्म ११ मे १८९५ रोजी मदनपल्ले या खेड्यात (तमिळनाडू) झाला. जिद्दू हे आडनाव. मध्यरात्री जन्म झाला व हे ८ वे बालक म्हणून कृष्णमूर्ती हे नाव ठेवले गेले. त्यांचे घराणे धार्मिक, सुशिक्षित. वडील नारायण अय्या थिआसफिस्ट व महसूल खात्यात सरकारी अधिकारी होते. आईचे नाव संजीवम्मा त्याही धार्मिक होत्या. जे. कृष्णमूर्तींचा स्वभाव उदार व गरिबांबद्दल करुणा बाळगणारा होता. ते धार्मिक वृत्तीचे, चिंतनशील, अंतर्मुख वृत्तीचे होते. त्यांचे बंधू नित्यानंद. निवृत्तीनंतर वडील मुलांसह अड्यारला राहावयास आले. सत्यापरता नाही धर्म हे थिआसफिस्ट संस्थेचे ध्येयवाक्‍य. डॉ. ऍनी बेझंट, लेडबीटर यांच्या मार्गदर्शनामुळे जे. कृष्णमूर्तींची आध्यात्मिक प्रगती बरीच झाली. जे. कृष्णमूर्तींनी जी टिपणे लिहून काढली, त्याचे प्रकाशन "ऍट दि फीट ऑफ दि मास्टर' या नावाने करण्यात आले. त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. "ऑर्डर ऑफ दि स्टार इन दि ईस्ट' या आंतरराष्ट्रीय संस्थेचे प्रमुख कृष्णमूर्ती होते. "हेराल्ड ऑफ दि स्टार' हे त्रैमासिकही कृष्णमूर्तींच्या संपादकत्वाखाली अड्यारमधून निघू लागले. त्यांचे निरागस, प्रेमळ, शांत व्यक्तिमत्त्व लोकांच्या डोळ्याला व मनाला शांती देत होते. ऍनी बेझंट यांच्यावर त्यांचे आईसारखे प्रेम होते; परंतु त्या स्वतःला त्यांच्या शिष्या मानू लागल्या. वयाच्या ८७ व्या वर्षीही त्यांच्यात दुर्दम्य उत्साह, ताजेपणा होता. कृष्णमूर्तींच्या मते मनुष्याच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व बौद्धिक अशा सर्व शक्तींचा संपूर्ण विकास घडवून आणते ते खरे शिक्षण. त्यांच्या मते, आत्मज्ञान ही शहाणपणाची सुरवात आहे. ध्यान म्हणजे सहजावस्था, सहज समाधी, अखंड अनुसंधान. जे. कृष्णमूर्तींच्या शिकवणीत प्रेमाला श्रेष्ठ स्थान आहे. ते म्हणतात, "जगाची दुःखे दूर करण्याचा प्रेम हाच एकमेव उपाय आहे.' प्रेमात आसक्ती नसते.
कृष्णमूर्तींचा जन्म ११ मे १८९५ रोजी तत्कालीन [[मद्रास]] प्रांतातील (आताच्या आंध्र प्रदेशातील [[चित्तूर]] जिल्हा) मदनपल्ले या छोट्या नगरात तेलुगूभाषिक कुटुंबात झाला. आठवा मुलगा झाला तर कृष्णाचे नाव त्याला द्यायचे या [[हिंदू]] प्रथेनुसार कृष्णमूर्ती हे नाव ठेवण्यात आले. जिद्दू हे कुलनाम. कृष्णमूर्तींचे वडील जिद्दू नारायणैया हे वासाहतिक ब्रिटिश प्रशासनाच्या सेवेत होते. संजीवम्मा या आपल्या आईचा कृष्णमूर्तींना लळा होता पण ते दहा वर्षांचे असताना संजीवम्मांचा मृत्यू झाला. नारायणैया-संजीवम्मा या दांपत्याला एकूण अकरा अपत्ये झाली, त्यांपैकी पाच जणांचा बालपणातच मृत्यू झाला.
 
इ. स. १९०३ मध्ये जिद्दू कुटुंब [[कडप्पा]] इथे स्थिर झाले. त्याआधीच कृष्णमूर्तींना [[हिवताप]] जडलेला होता. अनेक वर्षांपर्यंत त्यांना हिवतापाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. संवेदनशील, आजारी, स्वप्नांच्या दुनियेत असणारे हे बालक मतिमंद आहे असे सर्वांना वाटे आणि त्यामुळे शाळेत शिक्षकांचा तर घरी वडिलांचा मार नियमितपणे कृष्णमूर्तींना खावा लागे. अठरा वर्षांचे असताना लिहिलेल्या आपल्या आठवणींमध्ये त्यांनी १९०४ मध्ये मृत्यू पावलेली आपली बहीण व १९०५ मध्ये मृत्यू पावलेली आपली आई "दिसली" अशा परामानसी अनुभवांचे केलेले आहे. बालपणातच निसर्गाशी त्यांचे भक्कम बंध जुळले आणि हे बंध आयुष्यभर टिकले.
 
१९०७ मध्ये ब्रिटिशांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जिद्दू नारायणैया यांनी अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीत नोकरी धरली. रुढीप्रिय [[ब्राह्मण]] असण्याबरोबरच नारायणैया १८८२ पासून थिऑसॉफिस्टही होते. जानेवारी १९०९ मध्ये जिद्दू कुटुंब अड्यारला आले. थिऑसॉफिकल कुंपणाच्या बाहेर असलेल्या अस्वच्छ झोपडीत नारायणैया व त्यांचे पुत्र राहू लागले. सभोवतालच्या खराब परिस्थितीमुळे हे पुत्र कुपोषित बनले, त्यांना उवांचाही त्रास होऊ लागला.
 
{{विस्तार}}