"लक्ष्मीपूजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लक्ष्मीपूजन विस्तार
ओळ १:
*[[आश्विन अमावास्या]] - [[दिपावली]] दुसरा दिवस - [[हिंदूधर्मातील सण आणि उत्सव]]
 
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी(संध्याकाळी) लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात [[लक्ष्मी]], [[श्रीविष्णु]] इत्यादी देवता आणि [[कुबेर]] यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.
या दिवशी प्रदोषकाळी(संध्याकाळी)लक्ष्मीचे पूजन केले जाते.[[लक्ष्मी]] ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे,शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे.
 
अनेक घरांत [[श्रीसूक्त]]पठणही केले जाते.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा [[स्वस्तिक]] यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
 
आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्माfनष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
 
== संदर्भ==