"येवला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: zh:耶沃拉
छोNo edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १:
{{विस्तार}}
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[येवला तालुका|येवला तालुक्याचे]] गाव आहे. येथे हातमागावरील [[पैठणी]] विणण्याचा व्यवसाय आहे. काही ठिकाणी [[यंत्रमाग]] वापरले जायला लागले आहेत. पैठणीवरील पारंपारिक नक्षीदार कलाकुसरीसाठी [[येवला]] प्रसिद्ध आहे. या नक्षीमध्ये मोराची प्रतिमा अधिक लोकप्रिय आहे. येथील पैठण्या निर्यातही होतात.
येथील पैठण्या निर्यातही होतात.
 
इ.स. १८५७ च्या भारतीय उठावातील सेनानी [[तात्या टोपे]] यांचा जन्म येवल्यात झाला {{संदर्भ हवा}}.
 
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' या अशी ऐतिहासिक घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवला येथे प्रथम केली. त्याला ७५ वषेर् पूर्ण होत आहे. आंबेडकरांनी येवल्याच्या या ऐतिहासिक घोषणेच्या २१ वर्षांनंतर नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घोषणेची पूतीर् केली. नागपूर हा धर्मांतराचा कळस तर मुक्ती भूमी येवला हा धर्मांतराचा पाया आहे.
 
=='''येवला भौगोलिक माहिती'''==
{{अशुद्धलेखन}}
हिंदी आणि उर्दू भाषा चे प्रसिध्‍द लेखक एम मुबीन चा संबध सुध येवले शी आहेण्‍ एम मुबीन चा जन्‍म 2 जून 1958 वर्षी येवला येािी लमाममीन पुरा भागात झालाण्‍ त्‍याचे वछीलांचा नाव मोहम्‍मद उमर हाता ते येवला नगर पालिकेत कामा ला होते एम मुबीन ने आपली प्रथमिक शिक्षा उर्दू शाळा क्र 1 मध्‍य पूर्ण केली अंगलो उर्दू हाय स्‍कूल येवला येथे दहावी प्रयन्‍त शिक्षण पूर्ण करून जनता विददयाल व आट्र् आणिक कामर्स कालेज येवला येथे पदवी घेतलेण्‍ त्‍यांचे हिंदी आणि उर्दू भाषेत 35 पुस्‍तके प्रकाशित झााली आहे
2001 वर्षी त्‍याना त्‍याची हिदी पुस्‍तक यातना का एक दिन वर राष्‍टीय अहिदी लेयाक पुरस्‍कार 50 हजार रूपये प्रधान मंत्री अटल बिहारी वाजपाय चे हस्‍ते मिळाला त्‍यांन चार राज्‍य सरकार पुरस्‍कार सुधा त्‍याचं पुस्‍तका वर मिळालेले आहे
 
 
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर'''
 
हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही' या अशी ऐतिहासिक घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवला येथे प्रथम केली. त्याला ७५ वषेर् पूर्ण होत आहे.
आंबेडकरांनी येवल्याच्या या ऐतिहासिक घोषणेच्या २१ वर्षांनंतर नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घोषणेची पूतीर् केली. नागपूर हा धर्मांतराचा कळस तर मुक्ती भूमी येवला हा धर्मांतराचा पाया आहे.
 
 
'''येवला भौगोलिक माहिती'''
 
येवला उर्फ येवले हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे. येथे नगरपालिका असुन तिची स्थापना इ.स 1853 साली झालेली आहे. मनमाडच्या दक्षिणेस 29 किमी तसेच शिर्डी पासुन उत्तरेकडे ३३ किमी अंतरावर नगर-मनमाड व नाशिक औरंगाबाद महामार्गच्या चौफुलीवर वसलेले आहे. जागतिक नकाशात अक्षांश 20.03 व रेखांश 74.43. या वर आहे. तसेच समुद्र सपाटीवरुन 560 मी उंचीवर आहे.
येवला तालुक्यात अंजीठा पर्वत रांगातील डोंगरे असुन अनकाई व टनकाई किल्ले आहेत.
 
=='''येवला पैठणी--'''==
 
येवला पैठणी ''पैठणी'' हा शब्द खास करून अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे. पैठणी खास करून औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे पूर्वी तयार होत असल्याने अशा या विशिष्ठ साडीस पैठणी हे नाव पडले आहे. पैठणीचे उत्पादन स्वातंत्रपूर्व कालापर्यंत राजाश्रयाने चालत आले. राजाश्रय संपल्यानंतर याचे खास कारागीरांना रोजगार नाहीसा झाल्याने तेथून ते विस्कळीत झाले व जुन्या विणकामामध्ये काम मिळेल तेथे समावेश होत गेले. बनारसी पद्धतीचा शालू, साडी व फेटे करू लागले. त्यातील काही कसबी कामगार किंवा कारागीर निजामशाहीच्या हद्दीबाहेरचे गाव येवला येथे येऊन स्थायिक झाले. महाराष्ट्रातील येवला व पैठण येथे तयार होणारी पैठणी जगात प्रसिद्ध असून तिला परदेशातून मागणी आहे. पैठणी तयार करणे ही पैठण व येवला येथील पारंपारीक कला आहे. सन 1973 मध्ये हिमरु पैठणी मश्रूम प्रदर्शनात मांडली गेली व त्यास चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर 75-76 मध्ये येवल्यातील कारागीरांनी पैठणी प्रदर्शनात ठेवली व त्यावेळेस येवल्यात असलेल्या कारागीरांना सुमारे 5 वर्ष पुरेल असे काम मिळाले व 74-75 पासुन येवला पैठणी अस्तित्वात आली. 1977 मध्ये पहिले हातमाग प्रदर्शनामध्ये येवला पैठणीने प्रसिद्धी मिळविली. त्यावेळी अवघे 100 माग येवला येथे होते. आज येवला, नागडे, वडगांव, बल्लेगांव, सुकी 1ध्4गणेशपूर1ध्2 या गावामध्ये एकूण 850 कुटुंबे 2200 मागावर आपला व्यवसाय करीत आहेत. यातील काही कारागिरांनी राष्ट्रपती पुरस्कार, राज्य पुरस्कार व इतरही काही पुरस्कार मिळविले आहेत. येवला आणि उपरोक्त परिसरातील कारागीर हे क्षत्रिय खत्री, साळी, कोष्टी, मराठा, नागपूरी समाजातील आहेत. आर्थिक दश्ष्टया उपरोक्त कारागीरांची प्रामुख्याने वर्गीकरण करता येईल.
 
1. कोणतेही भांडवल उपलब्ध नसलेले उधारीवर कच्चा माल आणून पैठणी तयार करून देणारे
 
2.कच्चा माल खरेदी करून पैठणी तयार करून देणारे
32. कच्चा माल देऊनखरेदी करून पैठणी तयार करवून घेणारेकरून व्यापारीदेणारे
 
3. कच्चा माल देऊन पैठणी तयार करवून घेणारे व्यापारी
 
इ.डी.पी. अंतर्गत 25 कारागिरांचे सेंट्रल सिल्क बोर्ड यांचे सहकार्याने 1 महिन्याचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यापैकी 2 प्रशिक्षणार्थंींनी आपली प्रगती केली आहे. पैठणीमध्ये प्रामुख्याने सेमी पैठणी, सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. याशिवाय पदराच्या व काठ यांच्या विशिष्ठ नक्षीकामानुसार मुनिया ब्रॉकेट व ब्रॉकेट असे वर्गीकरण करता येते. तसेच विणकाम पद्धतीनुसार एकधोटी व तीन धोटी असेही प्रकार दिसून येतात. सिंगल पदरमध्ये काठ नारळाच्या नक्षीचा काठ व पदरामध्ये तीन मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते, डबल पदरामध्ये नारळ काठ व सात मोर जोडीचे नक्षीकाम केलेले असते. यासाठी रेशीम धागा वापरला जातो. टिशू पदरामध्ये जर शक्यतो त्रिम वापरली जाते व पदरामध्ये बारा मोर अगर कोयरी तीन ओळीत नक्षीकाम केलेले असते. रिच पदरमध्ये ग्राहकाच्या पसंतीनुसार पदराच्या नक्षीकामाची निवड केली जाते. सिंगल पदर 18-21 इंचाचा तर डबल पदर 28-32 इंचाचा असतो. सिंगल पदर पैठणीस 4 ते 5 दिवस, डबल पदर पैठणीस 7 ते 8 दिवस, टिशू पदर 1 ते दीड महिना व रिच पदर पैठणीस 4-6 महिने विणकामास लागतात. पदराच्या नंतर एक मीटर पर्यंत बुटी 3 इंच अंतरावरती व त्यानंतरच्या 6 इंच अंतरावर असतात. यामुळे 3 इंच अंतरावर असलेल्या दाट बुटयांचा भाग हा पदरानंतर दर्शनी भागावर येतो तर विरळ बुटयांचा भाग हा निऱ्यांमध्ये जातो त्यामुळे पैठणी उठावदार दिसते.
 
मुनिया ब्रॉकेट पैठणीचे वैशिष्ठय म्हणजे काठ लहान व पोपटाची चोच लांब असते यामध्ये सिंगल पदर, डबल पदर आणि रिच पदर येऊ शकतात. ब्रॉकेट पैठणीमध्ये राजहंस, मोर, पोपट, आसावली व कमळ यांचे नक्षीकाम पदरामध्ये ग्राहकांच्या पसंतीने केले जाते. एक धोटीमध्ये सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. तीन धोटीमध्येही सिंगल पदर, डबल पदर, टिशू पदर, रिच पदर हे प्रकार येतात. यास कडियल किंवा परती असेही म्हणतात. पैठणी साडीची किंमत साधारणपणे रु.2500 पासुन 3 लाख रुपयापर्यंत असते. मध्यम व उच्चवर्गीय ग्राहक 5 ते 10 हजारापर्यंतची पैठणी पसंत करतात.
 
'''तात्या टोपे'''
 
 
रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे (१८१४ - एप्रिल १८, १८५९) हे १८५७ च्या उठावामधील सेनानी होते.
जीवन
१८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवल्यातला त्यांचा जन्म. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. त्यांचे मूळ नाव रघुनाथ. त्यांचे नाव रामचंद्र असेही ठेवण्यात आले होते. रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर गेले. पुढे बरीच वर्षे नानांच्या दरबारात तात्या कारकुनी कामांत गुंतलेले होते. १८५७ च्या समरात ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी त्यांचीच निवड केली. त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.
 
१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला. कमकुवत सैन्य, नियोजनाची कमतरता, पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती. पण तात्यांची ध्येयासक्ती प्रचंड होती.
 
नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास, ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्र्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत होता. शत्रूवर जरब बसवत, वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा यत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता. तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.
 
तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्र्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.
 
७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, होता तो देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान! १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. १८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आले. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे ऊर दु:खाने पण अभिमानानेही भरून आणणारी ही घटना तात्यांसारख्या मराठी वीराची ख्याती जगभर पसरवून गेली.
 
 
posted by Sagar Achari
 
 
[[वर्ग:येवला तालुका]]
"https://mr.wikipedia.org/wiki/येवला" पासून हुडकले