"इटालियन द्वीपकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250 px|इवलेसे|इटलीचे अवकाशचित्र '''इटालियन द्...
(काही फरक नाही)

१४:१४, २५ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

इटालियन द्वीपकल्प (इटालियन: Penisola italiana) हा दक्षिण युरोपामधील तीन मोठ्या द्वीपकल्पांपैकी एक आहे (इबेरियन द्वीपकल्पबाल्कन हे इतर दोन). इटली ह्या देशाचा मोठा भाग ह्या द्वीपकल्पावरच स्थित आहे. तसेच सान मरिनोव्हॅटिकन सिटी हे दोन सार्वभौम देश देखील इटालियन द्वीपकल्पावर वसले आहेत.

इटलीचे अवकाशचित्र

१,३१,३३७ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या इटालियन द्वीपकल्पाच्या उत्तरेला आल्प्स पर्वतरांग, पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, दक्षिणेस आयोनियन समुद्र तर पश्चिमेस तिऱ्हेनियन समुद्र हे भूमध्य समुद्राचे उपसमुद्र आहेत.