"भूकंप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
please send prevention metjod
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
--[[विशेष:योगदान/114.143.48.199|114.143.48.199]] १६:२६, ३० सप्टेंबर २०१२ (IST){{अशुद्धलेखन}}
 
'''भूकंप ''' - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लाटा" तयार होण्यात होऊन [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूपृष्ठ हादरते.
 
भूगर्भात अकस्मात घडलेल्या भू-हालचालींमुळे भूकवचास जे हादरे बसतात त्यालाच भूकंप म्हणतात. भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.
 
नैसर्गिक रीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पृथ्वीवर ज्याठिकाणीज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे. कॅलिफोर्नियातील सॅनफ्रॅन्सिको येथील १९०६ मधील भूकंप, १८९७ चा आसामचा भूकंप, १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप होते.
 
दुसरे कारण : ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेदेखील भूकंप घडतात. १८६८ मध्ये हवाई बेटांमधल्या ’मौना लोआ’ ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी तेथे सतत सहा दिवस वाढत्या तीव्रतेचे भूकंप होत होते. सामान्यत: ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे घडणारे भूकंप हे मर्यादित क्षेत्र व्यापणारे व कमी विध्वंसक असतात.
ओळ ११:
 
[[चित्र :EastHanSeismograph.JPG|thumbnail|right|चिनमधील झँग हेंग ने बनविलेल्या, भूकंपाची नोंद घेणाऱ्या, जगातील प्रथम यंत्राची प्रतिकृती : यास होउफेंग डिडोंग यी असे नाव होते.]]
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास "[[सेस्मोग्राफ]]" अथवा "सेस्मॉमीटर" असे नाव आहे. तसेच भूकंपाची महत्ता’महत्ता’ मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची तीव्रता’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
 
३ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा कमी महत्तेचे भूकंप जास्त धोकादायक नसतात. महत्ता ७ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास प्रचंड प्रमाणात हानी होऊ शकते. भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी.
ओळ २४:
 
=== भूकंपमापनाचे रिश्टर नावाचे परिमाण ===
वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांच्या परिणामांचे वर्णन खाली दिले आहे. या तक्त्याचा विशेष काळजीपूर्वक अभ्यास करावयास हवा. एखाद्या गावी जाणवणारी भूकंपाची तीव्रता व तदनुषंगाने होणारे दुष्परिणाम फक्त भूकंपाच्या महत्तेवरच अवलंबून नसून त्या गावाचे केंद्रबिंदूपासूनचे अंतर, भूकंपाच्या नाभीची भूकंपकेंद्रापासूनची जमिनीखालील खोली व गावाची आणि त्याच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती यांवरही अवलंबून असतात.(काही प्रदेश भूभुकंपाच्याभूकंपाच्या संकेतांची(सिग्नलस्प्रतिदिनसिग्नल्स प्रतिदिन) तीव्रता वाढवतात.)<ref>[http://earthquake.usgs.gov/learning/faq.php?categoryID=2 USGS: FAQ- Measuring Earthquakesयुनायटेड स्टेट्‌स जिऑलॉजिकल डॉक्युमेंट्‌स वर आधारित]</ref>
 
{| class="wikitable"
"https://mr.wikipedia.org/wiki/भूकंप" पासून हुडकले