"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: co:Geografia
ओळ १४:
मध्ययुगाच्या काळात [[रोमन संस्कृती]] लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा [[युरोप]]कडून मुस्लिम जगाकडे आली. इद्रिसी (Idrisi), इब्न बतूत, (Ibn Batutta), इब्न खलादुन (Ibn Khaldun) यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरित करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रीकांची सर्व साहित्यसंपदा अनेक शास्त्रज्ञांनी अनुवादित केली व [[बगदाद]] येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली.
 
सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये [[क्रिस्तोफर कोलंबस]], [[मार्कमार्को पोलो]] व [[जेम्स कुककूक]] यांनी पुष्कळ नवीन प्रदेशांचा शोध लावला. त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने [[पॅरिस]] व [[बर्लिन]] विश्वविद्यालयांचा समावेश होता.
अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता पुष्कळ भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली [[नॅशनल जियोग्राफिक सोसायटी]] यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डी ला ब्लैंचे यांनी योगदान दिले.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भूगोल" पासून हुडकले