"जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
लेखकाने हे पुस्तक "वास्तव नि स्वप्नभूमीला सांधणारा सेतू उभारणाऱ्या तमाम डोळियाआंतील आसवांना -" अर्पण केले आहे. ऋणनिर्देशात मात्र लेखकाने आपल्याला "ह्या शब्दप्रपंचाचा 'निमित्त-निर्मिक' म्हणवून घेणे आवडेल" असे म्हटले आहे.
==परिचय==
सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून या पुस्तकाचा प्रारंभ होतो. कॅलेंडर वर्षांनुसार या पुस्तकात एकेक प्रकरण आहे. प्रकरणांची रचना मालिकानिहाय केलेली आहे. प्रत्येक मालिकेतील सचिनच्या कामगिरीच्या तपशीलवार नोंदी देणार्‍यादेणाऱ्या तालिकेने प्रकरण सुरू होते. मग प्रत्येक सामन्याबद्दल लेखकाने सचिनला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला गोषवारा येतो. सचिनच्या कामगिरीसोबतच त्या सामन्यातील इतर लक्षवेधी घडामोडींचीही लेखकाने यथाशक्ती दखल घेतल्याने पुस्तक अधिक रंजक झाले आहे.
या पुस्तकामधील तपशीलाबद्दल एकच गोष्टीचा उल्लेख पुरेसा ठरेल : सचिनचे झेल ज्यांनी घेतले त्यांचा तपशील धावफलकांमध्ये सर्वत्र मिळतोच; पण केवळ कसोट्या आणि एकदिवसीय सामन्यांमध्येच नव्हे तर इतर प्रथमश्रेणी आणि यादी 'अ'मधील सामन्यांमध्ये ज्यांचे झेल सचिनने टिपले त्यांच्याही नावांचा उल्लेख या पुस्तकात मिळतो.
"आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीचा सचिन" हे प्रकरण सचिनच्या जडणघडणीचा थोडक्यात मागोवा घेते. ते विस्तृत असायला हवे होते.
कसोट्यांव्यतिरिक्त इतर प्रथम श्रेणी सामने आणि एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त मर्यादित षटकांचे इतर सामने यांच्यावर या पुस्तकात खास प्रकरणे आहेत. या सामन्यांचाही तपशीलवार सांख्यिकीय तपशील या पुस्तकात आहे.
वर्षवार कामगिरी आणि विक्रमांचे तपशील देण्याबरोबरच कर्णधार सचिनचे विश्लेषण (सांख्यिकीसह), प्रा. रमेश तेंडुलकर (सह-अनुभूतीचे किमयागार), माईक डेनेस प्रकरण, फेरारीच्या शुल्काची चर्चा, धनुर्धर कफोणि ( ''टेनिस एल्बो'' ) अशी माहितीपूर्ण उप-प्रकरणे या पुस्तकात आहेत.
 
==सांख्यिकी==