"अँतोनियो ग्राम्सी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
 
===धुरीणत्व===
धुरीणत्व (''हिगेमनी'') ही खास अॅन्तोनिओचीॲन्तोनिओची देणगी म्हणावी लागेल. वर्चस्व राखणाऱ्यास गटाचे विचारप्रणालीविषयक वर्चस्व म्हणजे धुरीणत्व. पारंपरिक मार्क्सवादी विचारांमध्ये राज्य हे शोषणाचे आणि बळाचे एक साधन मानले जाते. या भूमिकेत ग्राम्सीने बदल घडवून आणला. भांडवलदार वर्गाने मिळविलेली संमती ही छळा-बळाने किंवा मन वळवून मिळविलेली नसते तर शोषितांच्या परवानगीनेच मिळविलेली असते असे ग्राम्सीने दाखवून दिले. भांडवलदार संमतीचेही ‘उत्पादन’ करीत असतात असे तो म्हणतो. नागरी समाज हे धुरीणत्वाचे उगमस्थान आहे ही ग्राम्सीची धारणा नागरी समाजाच्या उदारमतवादी प्रारूपाला छेद देते. उदारमतवादी प्रारूपानुसार नागरी समाज ही स्वातंत्र्याची मोकळीक आणि शोषणरहितता असलेली जागा असते.
 
ग्राम्सीचे विचार मार्क्सच्या पाया आणि इमल्यात काही बदल घडवून आणतात. ग्राम्सीच्या म्हणण्यानुसार नागरी समाज हा सेंद्रियदृष्ट्या पायाशी जोडला गेलेला असल्याने पायाच त्याला आकार देत असतो. त्यामुळे उदारमतवाद्यांनी प्रक्षेपित केल्याप्रमाणे नागरी समाज कधीही तटस्थ असू शकत नाही. बदल घडवून आणावयाचा असेल तर केवळ पायाच बदलून भागणार नाही तर वर्चस्वाच्या मार्गांचा आणि साधनांचाही नायनाट करावा लागेल असे ग्राम्सी म्हणतो. श्रमिकवर्गाने प्रतिधुरीणत्वाची साधने उभारायला हवीत अशी सूचनाही तो करतो.