"अँतोनियो ग्राम्सी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ४६:
तत्त्वज्ञान, नीती, कला, कायदे हे सर्वांचे म्हणून मिरवले जात असले तरी ते वरिष्ठ वर्गाचेच धुरीणत्व करतात. मंदिरे, मठ, विद्यापीठे, प्रतिष्ठाने यांचे समाजातील माहात्म्य वरिष्ठ वर्गाचे धुरीणत्व रुजविण्याची प्रक्रिया पार पाडीत असतात. सामाजिक संस्था, पुराणे, मिथके, कला, साहित्य यांच्या माध्यमातून वरिष्ठ वर्गाची मूल्ये व विचारप्रणाली सर्व समाजाची मूल्ये व विचारप्रणाली म्हणून संपृक्त स्वरूपात कार्यरत होतात. यातून ‘राजकीय समाज’ व ‘नागरी समाज’ यांत सत्ता आणि संमतीचा परस्पर सामंजस्याचा समतोल निर्माण होतो. राज्य केवळ घटनेतील नियमांच्या आदेशानुसार चालत नाही तर ते सत्ता व संमती यांतल्या समतोलाने चालते हाही विचार या संकल्पनेतून पुढे आला.
 
राज्यांची वर्गवारी ग्राम्सीने अपारदर्शक आणि पारदर्शक अशी केली आहे. अपारदर्शक राज्यांमध्ये नागरी समाज अस्तित्वात असतो आणि त्यामुळे राज्याचे आधार समजावून घेऊन क्रांती घडवून आणणे मुश्कील असते (उदा.उदा० ब्रिटन, अमेरिका), असे त्याला वाटते. पारदर्शक राज्यांमध्ये नागरी समाजच अस्तित्वात नसतात. त्यामुळे शोषक हे राज्याचे स्वरूप ठळकपणे दिसून येते. अशा राज्यांमध्ये क्रांती घडवून आणणे सोपे असते (उदा० रशिया). ग्राम्सी हे वर्गीकरण क्रांतीचे नियोजन करणारांसाठीकरणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
 
===इमल्याचा सिद्धांत===