"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७४:
 
==शिकवण==
ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. ह्या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखादाएखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी आणि काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली. असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रुपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.
 
[[जैन धर्म]], [[हिंदू धर्म]], हसिदी मत, [[तंत्र]] मार्ग, [[ताओ]] मत, [[ख्रिश्चन धर्म]], [[बौद्ध धर्म]] अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर; विविध पौर्वात्य आणि पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू [[अद्वैत]] सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे. ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली तरी दोहोंच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे.
ओळ ८०:
अनेक पाश्चात्त्य कल्पनांचाही ओशोंनी वापर केला. विरोधांचे ऐक्य ही त्यांची कल्पना हेराक्लिटसची आठवण करून देते, तर मानवाचे यंत्र म्हणून त्यांनी केलेले वर्णन सिग्मंड फ्राईड आणि गुर्जेफ यांच्यासारखे आहे. पारंपरिक संकेतांच्या पलीकडे जाणार्‍या "नवमानवा"ची त्यांची कल्पना नित्शेच्या ''बियाँड गुड अँड ईविल'' ची आठवण जागवते. लैंगिक मुक्ततेवरील त्यांचे विचार डी. एच. लॉरेंसशी तुलना करण्याजोगे आहेत तर गतिशील ध्यानपद्धती विल्हेल्म राइखच्या पद्धतीवर आधारलेली आहे.
===ओशोंच्या "दहा आज्ञा"===
आचार्य रजनीश म्हणून वावरत असताना एका संवाददात्याने ख्रिश्चन धर्मातील "टेन कमांडमेंट्स"च्या धर्तीवर ओशोंना त्यांच्या आज्ञा विचारल्या होत्या. प्रतिसादादाखल ओशोंनी आपण कसल्याही प्रकारच्या आज्ञेच्या विरुद्धविरोधात असल्याचे सांगितले. "फक्त गमतीसाठी" त्यांनी पुढील दहा आज्ञा सांगितल्या :
{{cquote|
# तुमच्या आतूनही येत असल्याशिवाय कुणाचाही हुकूम मानू नका.
"https://mr.wikipedia.org/wiki/ओशो" पासून हुडकले