"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४१:
 
 
कल्याण स्वामींचे हस्ताक्षर अतिशय वळणदार होते. त्यांच्या हातचे २५० पानांचे बाड धुळे येथे आहे. ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असत, त्यामुळे त्यांची शरीरयष्टी अत्यंत बलदंड होती. नदीच्या पुरामध्ये उडी घेणे, सज्जनगडावरून खाली झेप घेणे अशी कामे ते लीलया करू शकत. त्यांची वस्त्रे हुर्मुजी (भगव्या) रंगाची असत .ते कौपिन परिधान करत.ते रुद्राक्षमाळा, [[जानवे|यज्ञोपवीत]], मुद्रिका, दाढी व जटा इत्यादी धारण करत असत.ते सर्वांगाला भस्म लावत. ते [[पातंजल योग|पातंजल योगामध्ये ]] अधिकार असलेले योगी होते. कल्याणस्वामींना 'योगिराज ' उपाधीने संबोधले जाते. त्यामुळेच त्यांचे चित्र योगमुद्रेमध्ये बसलेल्या स्थितीमध्ये आहे.त्यांच्या चित्रामध्ये त्यांनी पायाला 'योगपट्ट' बांधलेला दिसतो.कल्याण स्वामींना चित्रकलेमध्ये सुद्धा प्राविण्य होते. श्री कल्याण स्वामींनी रेखाटलेले श्री वीर मारुतीचे चित्र उपलब्ध आहे.समर्थांचे शिष्य किती विविध विषयांमध्ये निपुण होते याचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे हे चित्र होय. महाराष्ट्र ,कर्नाटक व आंध्रप्रदेश या भागात कल्याणस्वामींनी २५०पेक्षा अधिक रामदासी मठांची स्थापना केली आहे. ते उत्तम कीर्तनकार होते.वळणदार अक्षर, उत्तम पाठांतर, तेज:पुंज शरीरयष्टी, प्रतिभावंत कवी, योगी व एकनिष्ठ गुरुभक्त इत्यादी गुण आपणास श्री कल्याण स्वामींमध्ये आढळतात.
 
== साहित्यरचना ==