"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५०:
 
[[File:Sree kalyan swami samadhi.jpg|thumb|right|250px|कल्याणस्वामीची समाधी, डोमगाव, [[परांडा तालुका]] [[उस्मानाबाद जिल्हा]], [[महाराष्ट्र]]]]
सज्जनगडाहून निघाल्यावर कल्याण स्वामी शिरगाव,पंढरपूर,तुळजापूर या मार्गे डोमगावला आले. डोमगाव येथे आल्यावर स्वामींनी रामदासी कार्यास सुरुवात केली.वर्षातील ४ महिने डोमगाव ,४ महिने डोणजे व ४ महिने डोमगाव येथील कडा येथे त्यांचे वास्तव्य असे.सन १६७८ ते सन १७१४ पर्यंत कल्याणस्वामी डोमगाव येथे होते. या भागात त्यांनी विपुल प्रमाणात शिष्यवर्ग निर्माण केला. त्यांच्या ४४ शिष्यांची यादी उपलब्ध आहे. महाराष्ट्रातल्या [[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद जिल्ह्याच्या]] [[परांडा]] नामक गावी रामकथा संपूर्ण सांगून झाल्यावर [[आषाढ शुद्ध त्रयोदशी]], [[शा.श. १६३६]](इसवी सन १७१४) रोजी [[कल्याणस्वामींनी देह ठेवला.]] त्यांच्या पार्थिव देहाचे अंत्यसंस्कार डोमगाव येथे झाले. [[सीना नदी]]काठी असलेल्या डोमगावच्या या समाधिस्थळी सुमारे २५० वर्षे जुने असलेले कल्याणस्वामी समाधिमंदिर आहे. डोमगाव मधून वाहणाऱ्या सीना नदीचे कल्याण स्वामींनी 'श्रमहरणी' असे नामकरण करून तिची आरतीही रचली आहे.वर्तमान समाधिमंदिर हे त्यांचे उत्तराधिकारी श्री मुद्गल स्वामींच्या काळात, म्हणजे कल्याणस्वामी समाधिस्थ झाल्यानंतर ५९ वर्षांनंतर बांधले गेले.या मंदिरामध्ये [[४ शिलालेख]] आहेत . मंदिरामधील [[भव्य लाकडी सभामंडप]] मठपती श्रीरामबुवा यांनी सन १९१४ ते १९१८ या कालावधीमध्ये बांधला. कल्याणस्वामींची समाधी ही वालुकामय पाषाणाची आहे. या समाधिमंदिरात, जसा समर्थ रामदासस्वामींनी सांगितला व कल्याणस्वामींनी लिहून घेतला, अशा त्या दासबोधाची आद्य हस्तलिखित प्रत, कल्याणस्वामींची जपमाळ इत्यादी स्मृतिवस्तू ठेवल्या आहेत. दरवर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीला कल्याणस्वामींची पुण्यतिथी असते .
 
डोमगाव मठ परंपरेमध्ये पुढे [[सखाराम महाराज]] नावाचे सत्पुरुष होऊन गेले. रामदास>कल्य़ाण>मुद्गल>भिवाजी>महारुद्र>हनुमंत>सखाराम अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. त्यांनी कीर्तनांद्वारे रामदासी संप्रदायाचा प्रसार केला. संकेत कुबडी, लघुवाक्यवृत्ती इत्यादी ग्रंथांचे कर्ते हंसराजस्वामी हे यांचे जवळचे स्नेही होते. श्री सखाराम महाराज यांचा समाधीकाळ सन १८४०(?)आहे. त्यांची समाधी हैदराबाद येथे आहे. तसेच पुढे शंकराचार्य झालेले कल्याणसेवक महाराज तरुणपणी डोमगाव येथे साधनेसाठी राहिले होते. थोर समर्थभक्त अण्णाबुवा कालगावकर यांनी डोमगाव येथेच साधना करून साक्षात्कार करून घेतला. तसेच श्रीधर स्वामी यांच्या आई-वडिलांनी कल्याण स्वामी परंपरेमधील दत्तात्रेय स्वामींचा अनुग्रह घेतला होता. शंकर श्रीकृष्ण देव हे अनेक दिवस डोमगाव मठात येऊन राहिले होते. त्यांनी तेथून मूळ दासबोधाची शुद्ध प्रत लिहून घेतली व त्यावरून दासबोध प्रसिद्ध केला.