"सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
*चारशे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय डाव खेळणारा सचिन हा पहिला जागतिक फलंदाज आहे.
*सर्वाधिक मैदानांवर आंतरराष्ट्रीय एदिसा खेळण्याचा विक्रम : ९० मैदाने.
*२५ एप्रिल १९९० ते २४ एप्रिल १९९८ या कालावधीत भारतीय संघाने खेळलेल्या सर्व (१८५) एदिसांमध्ये तेंडुलकरही खेळलेला आहे. संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. <ref name="क्रिकइंफो">[[Cricinfo]] http://stats.espncricinfo.com/ci/content/records/128609.html</ref>
===धावा===
*आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा : आजवर १८ हजार ४२६ धावा.
*आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक शतके : आजवर ४९ शतके.
*आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक अर्धशतके : आजवर ९६ शतके.
*आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत किमान ५० धावांचे सर्वाधिक डाव : आजवर १४५ डाव.
*आंतरराष्ट्रीय एदिसामध्ये एका डावात द्विशतक काढणारा सचिन तेंडुलकर हा पहिला पुरुष फलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने १९९७ च्या विश्वचषकात एका डावात नाबाद २२९ धावा काढल्या होत्या.<ref>[[जागत्या स्वप्नाचा प्रवास]] {{स्रोत पुस्तक | पहिलेनाव = डॉ. आनंद | आडनाव = बोबडे | शीर्षक = | भाषा =मराठी | प्रकाशक =पूजा प्रकाशन | वर्ष = इ.स. २०१० | पृष्ठ = ३३६}}}.</ref>
*दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.
*चौदा हजार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा (आणि पुढील प्रत्येक धाव) जमविणारा एकमेव जागतिक फलंदाज.
===कॅलेंडर वर्षातील विक्रम===
*एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम : सन १९९८ मध्ये १,८९४ धावा.
*एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके : सन १९९८ मध्ये नऊ शतके.
===भागिदारीतील विक्रम===
*सलामीच्या जोडीने कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर व [[सौरव गांगुली]] यांच्या नावावर आहे. एकशे छत्तीस एदिसांमध्ये सलामी देताना २३ अर्धशतकीय आणि २१ शतकीय सलाम्यांसोबत ६,६०९ धावा त्यांनी जमविलेल्या आहेत.
*आंतरराष्ट्रीय एदिसामधील एका डावातील सर्वाधिक धावांची भागीदारी ३३१ धावांची आहे. या विक्रमाचे मानकरी आहेत : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (न्यूझीलंडविरुद्ध १९९९ मध्ये हैदराबाद इथे.)
*एका विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम : २००३ च्या विश्वचषकात ६७३ धावा.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
१,४२६

संपादने