"जागतिक समन्वित वेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''जागतिक समन्वित वेळ''' ({{lang-en|Coordinated Universal Time}}) किंवा '''यूटीसी''' हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे आजच्या घडीला जगातील सर्व स्थानांवरील [[प्रमाणवेळ]] ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. [[ग्रीनविच|ग्रीनविच सरासरी वेळ]] ही [[लंडन]]मधील [[ग्रीनिच]] ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व [[आंतरराष्ट्रीय कालविभाग]] आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.
 
==जीएमटीऐवजीजीएम् टीऐवजी यूटीसी का आले?==
लंडनमधील [[बिग बेन]] हे घड्याळ अत्यंत अचूक चालते. जवळच असलेल्या ग्रीनविच या वेधशाळेत सूर्य, तारे आदींच्या निरीक्षणातून पृथ्वीवरील घड्याळ्याची अचूक वेळ काढली जाई, आणि तिच्याप्रमाणे वेधशाळेतील क्रोनॉमीटर्स आणि अन्य घड्याळे जुळवून ठेवली जात. बिग बेन घड्याळ तीच वेळ दाखवते आहे की नाही याची दिवसातून अनेकदा तपासणी होत असे. ही सर्व घड्याळे यांत्रिक मशिनरीवर चालत. मशिनरीत काही बिघाड झाला तर पुढेमागे अचूक वेळ ठरविण्यास अडथळा होऊ शकला असता. त्यामुळे अचूक वेळ ठरविण्यास यंत्रांशिवाय दुसरे काही वापरणे गरजेचे होते.