"अश्वत्थामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
गुरु [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] पुत्र आणि सप्तचिरंजीवांपैकी एक. याच्या कपाळी जन्मापासूनच एक मणी असतो. अर्जुनाइतकाच शस्त्र आणि अस्त्र विदयेत पारंगत. द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खवू लगाली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठावूक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिग:मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी अवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न त्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून युधिष्ठिराला विचारले की खरच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने 'नरो वा कुंजरो वा' असे उत्तर दिले. या धक्क्याने द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टूद्युमनाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्याने त्याचा वध करत याचा बदला घेतला.
अश्वत्थम्याने महाभारत युद्धात कौरावांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्धं संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यूपन्थास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधारात पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी तो कापून आणतो. यावर संतप्त पाण्डव त्याला शोधत येतात. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रम्हास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्युची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतपर्यंत तू ही जखम कपाळी घेऊन दारोदार या जखमेसाठी लोकांना तेल मागत फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानल्या जाते.
 
{{सप्तचिरंजीव}}
{{महाभारत}}