"सिकलसेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
केशवाहिन्यामधून सिकल पेशी सुरळीतपणे वाहून नेल्या जात नसल्याने रक्त अवरोध निर्माण होतो. याच्या परिणामाने वेदना, आणि रक्तप्रवाह अवरोधामुळे उतीनाश होतो. वेदनाशामके घेतल्यानंतर किरकोळ तक्रारी दूर होतात. तीव्र वेदना थांबवण्यासाठी ओपियम (अफू) वर्गीय औषधांचा वापर करावा लागतो. फुफ्फुसे आणि शिस्नामधील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आल्यास तातडीचे उपचार करावे लागतात.
 
'''प्लीहेमधील गुंतागुंत'''
अरुंद रक्तवाहिन्या आणि प्लीहेमधून रक्त वाहून नेण्यामधील अडथळ्यामुळे सिकलपेशी आजार झालेल्या व्यक्तीची प्लीहा नेहमीपेक्षा मोठी होते. कुमार वयामध्ये प्लीहा मोठी झाल्याचे लक्षात येते. अशा वेळी प्लीहा शस्त्रक्रियेने काढून टाकल्यास जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. ज्यारुग्णांची प्लीहा काढून टाकली आहे अशा रुग्णाना लसीकरण आणि प्रतिजैविके यांचा उपचार जन्मभर घ्यावा लागतो. प्लीहा मोठी होणे वेदनाजन्य असते. प्लीहेमध्ये साठलेले रक्त एकएकी बाहेर आल्याने रक्तरसाचे (प्लाझमा) प्रमाण कमी होते. रक्तपेशी आणि रक्तरस यांचे गुणोत्तर 15 टक्क्यानी कमी होणे हे धोकादायक ठरते. पोट हाताने चाचपल्यास कडक लागते. एक दोन तासात यावर उपचार न केल्यास रुग्ण दगावतो. कधी कधी बाहेरून रुग्णास रक्त द्यावे लागते.
 
'''सिकलपेशी आजारामुळे रक्तक्षय :''' रुग्णामधील रक्तक्षय, शक्तिपात आणि नाडी प्रति मिनिटास शंभरहून अधिक होणे. हे लक्षण हृदयाची गति वाढल्याचे आहे. अशा वेळी पॅरव्हायरस बी19 या विषाणू संसर्गामुळे तांबड्या पेशींचा नाश होतो. दोन ते तीन दिवसात तांबड्या पेशी तयार होणे पूर्णपणे थांबते. सामान्य व्यक्तीमध्ये या विषाणूमुळे फारसा परिणाम होत नाही. पण सिकल पेशी आजार झालेल्या रुग्णामध्ये गंभीर स्थिति उद्भवते. सामान्य व्यक्तीच्या अस्थिमज्जेमध्ये नव्या तांबड्या पेशी तयार होतात. त्या पूर्णपणे तयार झाल्या शिवाय रक्तप्रवाहामध्ये येत नाहीत. सिकल पेशी आजारामध्ये अपरिपक्व रक्तपेशी रक्तप्रवाहामध्ये आढळणे ही गंभीर स्थिति आहे. अपरिपक्व रक्तपेशीस ‘रेटिक्युलोसाइट’ म्हणतात. सिकलपेशी रुग्णामधील हीमोग्लोबिन कमी झाल्याचे आढळल्यास रेटिक्युलोसाइटसची संख्या मोजून उपचार ठरवावे लागतात. हे सामान्य पेशींचा झपाट्याने –हास होत असल्याचे लक्षण आहे. यामुळे रक्तामधील हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. रुग्ण पूर्ववत होण्यास चार दिवस ते एक आठवडा लागतो. काहीं रुग्णाना रक्त द्यावे लागते.
सिकल पेशी आजाराचे वयाच्या सहाव्या महिन्यामध्ये दिसणारे सर्वात प्राथमिक लक्षण म्हणजे हाता पायाच्या बोटांची आग होणे. छातीत दुखणे, ताप,श्वसनास अडथळा, न्यूमोनियासारखी लक्षणे, अस्थिमज्जेमध्ये गुठळ्या, अशा व्याधीना तोंड द्यावे लागते.
 
मध्य [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] काही विशिष्ट [[जात|जातींमध्ये]] आढळणारा एक [[आनुवंशिक]] रोग<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/52250</ref>.यात रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण बिघडुन गोल स्वरुपात असणाऱ्या लाल रक्तपेशी ह्या विळ्याच्या आकाराच्या होतात. सामान्य माणसाच्या रक्तपेशी सुमारे १२० दिवस जिवंत राहतात पण या रोगग्रस्ताच्या फक्त ३० ते ४० दिवस.महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे या रोगाने प्रभावित आहेत.[[विदर्भ|विदर्भातील]] एकही जिल्हा सिकलसेलमुक्त नाही. लगतच्या [[मध्यप्रदेश]] [[आंध्र प्रदेश]] [[छत्तिसगढ]] आदि राज्यातपण असलेला हा रोग भारतातील एकुण १२ राज्यात आढळला आहे.[[विदर्भ|विदर्भात]] याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत.<ref>http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/52262</ref>सुमारे ४६ जाती या रोगाने ग्रस्त आहेत. हा जन्मापासुनच होणारा रोग आहे. यात रुग्णाचे आयुष्य फार तर १७-१८ वर्षाचेच असते.हा रोग प्रजोत्पादनाद्वारे पसरतो.याच्या रोगनिवारणासाठी औषधोपचाराचा अद्याप शोध लागला नाही.
[[Image:Autorecessive.svg|right|thumb|200px|Sickle-cell disease is inherited in the autosomal recessive pattern.]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिकलसेल" पासून हुडकले